कोरोनाच्या Delta Strain मुळे संक्रमित झालेल्या रुग्णांच्या शरिरात दुप्पटीने अँन्टीबॉडीची निर्मिती- रिपोर्ट्स

देशभरात कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची शक्यता पाहता त्याच्या विरोधात लढण्यासाठी तयारी सुरु केली आहे. सध्या कोरोनाच्या रुग्णांचा आकडा कमी झाला असला तरीही नागरिकांना नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे. अशातच काहीजणांकडून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसंदर्भात विविध प्रश्न विचारले जात आहे. यावर डॉक्टरांच्या मते, कोरोनाची तिसरी लाट ही कधीही आपला परिणाम दाखवू शकते. मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवेळी जे संक्रमित झाले होते त्यांच्या शरिरात ज्या प्रकारे अँन्टीबॉडीज तयार झाले त्याचे परिणाम समोर आले. त्यानुसार त्यांच्यावर कोरोना संक्रमणाचा परिणाम हा जेवढा विचार केला होता तेवढा झाला नाही.

अमर उजाला मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या आगरा मध्यील एका सर्वेत असे दिसून आले की, कोरोनाच्या डेल्ट्रा स्ट्रेन संक्रमित लोकांना पहिल्या लाटेत संक्रमित झालेल्या लोकांच्या तुलनेत दुप्पीट अँन्टीबॉडी मिळाल्या आहेत. या रुग्णांमध्ये 1000 आईयू/एमएल पर्यंत अँन्टीबॉडीज मिळाल्या आहेत. तर कोरोनाच्या पहिल्या लाटेत संक्रमित झालेल्या लोकांमध्ये 500 आईयू/एमएल पर्यंत अँन्टीबॉडी तयार झाल्या होत्य. हा सर्वे अशा लोकांवर करण्यात आला आहे ज्यांनी अद्याप कोरोनावरील लस घेतलेली नाही.(Heart Attack In Youth: कमी वयात हार्ट अटॅक कसा टाळाल? मुंबईच्या प्रख्यात हृदयरोगतज्ज्ञांकडून जाणून घ्या 6 अनमोल टिप्स!)

रिपोर्ट्सनुसार, एसएन मेडिकल कॉलेजच्या ब्लड ट्रांसफ्युन मेडिसिन विभाध्यक्ष डॉ. नीतू चौहान यांनी असे म्हटले की, एप्रिल आणि मे मध्ये संक्रमित 121 लोकांच्या अँन्टीबॉडी तपासून पाहिल्या. या लोकांनी कोरोनावरील लसीचा एक ही डोस घेतलेला नाही अशी त्या व्यक्ती आहेत. या लोकांमधील 63 जणांमध्ये 100 ते 1000 आईसू/एमएल अँन्टीबॉडी मिळल्या होत्या.

सर्वे मध्ये सहभागी झालेल्यांनी असे म्हटवे की, दुसऱ्या लाटेदरम्यान त्यांना गंभीर संक्रमण झाले होते. दुसऱ्या लाटेत कोरोना व्हायरसच्या डेल्टा स्ट्रेनची पुष्टी झाली होती. तसेच शरिरात अँन्टीबॉडीज सुद्धा दुप्पट तयार झाल्या. तपासात असे ही दिसून आले की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवेळी संक्रमित होऊन बरे झाल्यानंतर लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांमध्ये 10-25 हजार आईसू/एमएल अँन्टीबॉडीज मिळाल्या आहेत. जी लोक कोरोनामुळे संक्रमित झालेली नाही आणि दोन्ही डोस घेतले आहेत त्यांच्यामध्ये 2-10 हजार आईयू/एमएल अँन्टीबॉडी मिळाल्या आहेत. त्याचसोबत पहिल्या लाटेत संक्रमित झाल्याच्या 12 महिन्यानंतर ही लोकांमध्ये अँन्टीबॉडी निर्माण झाल्या आहेत.