चीनमध्ये एका व्यक्तीच्या फुफ्फुसांमध्ये (Lung) जंत (Worm) सापडले आहेत. या व्यक्तीने कच्चा साप (Snake) तसेच काही सीफूडचे सेवन केले होते. सध्या ही व्यक्ती मृत्यूशी झुंज देत आहे. डेली मेलच्या वृत्तानुसार, वांग असं या व्यक्तीचं आडनाव आहे. वांग यांना फुफ्फुसाचा त्रास जाणवू लागला. त्यांच्या फुफ्फुसात जंत आढळून आले. हा आजार होण्यामागे कच्चे अन्न किंवा अशुद्ध पाणी पिणे हे कारण असू शकते. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर डॉक्टरांना वांग यांच्या आहाराविषयी माहिती समजली.
वांग हे दररोज आहारात क्रेफिश, गोगलगाय, आदी सारख्या सीफूडचे सेवन करतात. तसेच त्यांनी कच्च्या सापाचे सेवन केले होते. त्यामुळे वांग यांना पॅरागोनियायसिस (Paragonimiasis) या आजाराचे निदान झाले आहे. वांग यांच्या सीटी स्कॅनमध्ये त्यांच्या फुफ्फुसातील जंत दिसून आले आहेत. वांग यांना चीनच्या जिआंग्सु प्रांताच्या सुकियान येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना पॅरागोनिमियासिसचे निदान झाले आहे. (हेही वाचा - Coronavirus: मोबाईल, चार्जर याशिवाय आणखी काय हवं सोबत? कोविड-19 तपासणीसाठी जाताना काय काळजी घ्याल?)
पॅरागोनिमियासिस म्हणजे काय?
पॅरागोनियामियासिस ला फुफ्फुसातील फ्लू असंही म्हणतात. हा एक संसर्ग फुफ्फुसात ट्रामाटोड्स, पॅरागोनिमस या प्रजातीद्वारे होतो. हा फ्लू फुफ्फुसाला लक्ष्य करते. या आजाराचे निदान केवळ वैद्यकीय तज्ञाद्वारे केले जाऊ शकते.
पॅरागोनिमियासिसची लक्षणं -
पॅरागोनियामियासिस आजाराचे निदान झाल्यानंतर खोकला होतो. तब्बल 3 आठवड्यांपेक्षा जास्त काळ खोकल्याचा त्रास जाणवतो.
रक्ताची थुंकी
सध्या संपूर्णे जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. चीनच्या वुहान शहरातून हा आजार जगाच्या कानाकोपऱ्यात पसरला आहे. या जीवघेण्या विषाणुमुळे हजारो लोकांचा बळी गेला आहे. भारतात 35 हजारांपेक्षा जास्त जणांना कोरोनाची लागण झाली आहे.