
Onion Cutting Tips: स्वयंपाक घरातील कांदा ही अशी जीन्नस आहे जी, प्रत्येक भाजी करताना लागते. अनेकदा अशा काही भाज्या आहेत ज्यामुळे कांदा घातला नाही तर त्याला चव येत नाही. त्यामुळे प्रत्येक भाजीत कांद्यामुळे वेगळी चव येते. परंतु, कांदा कापताना तुमच्या डोळ्यांतूही पाणी येत असेल, तर हा लेख तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे. आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहोत ज्या तुम्ही कांदा कापताना अवलंबल्या तर तुमच्या डोळ्यांतून एक थेंबही पाणी येणार नाही. चला तर मग या उपयुक्त ट्रिक्सबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
कांदा कापण्यापूर्वी तो फ्रिजमध्ये ठेवा
कांदा कापताना होणारा त्रास टाळण्यासाठी तुम्ही कांदा कापण्यापूर्वी तो अर्धा तास फ्रिजमध्ये ठेवू शकता. जेव्हा तुम्ही असे करता तेव्हा तुमच्या डोळ्यांमधून पाणी अजिबात येणार नाही. (हेही वाचा - Intermittent Fasting vs Calorie Restriction: वजन नियंत्रणासाठी कोणता आहार अधिक प्रभावी? अधूनमधून उपवास की कॅलरी प्रतिबंध? घ्या जाणून)
चाकूवर लिंबाचा रस लावा
डोळ्यातून पाणी येण्यापासून रोखण्याचा एक मार्ग म्हणजे कांदा कापण्यापूर्वी चाकूवर लिंबाचा रस लावा. असं करणं तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते.
कांदा पाण्यात बुडवा -
जर तुम्हाला कांदा कापताना तुमच्या डोळ्यांतून पाणी येत असेल तर तुम्ही तो सोलून कापण्यापूर्वी अर्धा तास पाण्यात ठेवा. जेव्हा तुम्ही असे करता तेव्हा कांद्यामध्ये असलेला वायू पाण्यात मिसतो. त्यामुळे कांदा कापताना तुमच्या डोळ्यांतून पाणी येत नाही.
कांदा व्हिनेगरमध्ये बुडवा -
कांदे कापताना तुमच्या डोळ्यांतून पाणी येऊ नये, यासाठी तुम्ही ते सोलून काही वेळ व्हिनेगरमध्ये बुडवून ठेवू शकता. यामुळे तुम्हाला कांदा कापताना त्रास होणार नाही.