अनेक लोक रात्री शल्लक राहिलेले अन्न, खराब झाले असेल म्हणून फेकून देतात. आमटी अथवा भाजी फ्रीजमध्ये ठेवली जाते, मात्र रात्रीची पोळी अथवा चपाती सकाळी कडक होते म्हणून नाईलाजाने ती टाकून द्यावीच लागते. तसेच हा सुद्धा समज असतो की, असे शिळे अन्न आपल्या आरोग्यासाठी चांगले नाही. मात्र हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल, ही शिळी पोळी तुमच्या शरीरासाठी अतिशय आरोग्यदायी असते. बारा ते सोळा तास आधी बनविलेली पोळी आरोग्याला हानिकारक नाही. पण त्यापेक्षा जास्त काळ ठेवलेल्या पोळ्यांचे सेवन टाळायला हवे. चला जाणून घेऊया काय आहे शिळी पोळी खाण्याचे फायदे
> ब्रेकफास्टसाठीचा अतिशय उत्तम पर्याय –
ताज्या चपातीपेक्षा शिळी चपाती हेल्दी आहे. शिळ्या चपातीमध्ये मऊपणा नसल्याने ती जास्त वेळ टिकते. तसेच तिच्यात अनेक पोषणमुल्ये देखील समाविष्ट असतात, यांच्या सेवनामुळे शरीराला आवश्यक ती ऊर्जा ताबडतोप मिळते. तसेच सकाळी उठल्यावर खूपच भूक लागली असल्यास अतिशय कमी वेळात अनेक गोष्टी तुम्ही या शिळ्या पोळीपासून बनवू शकता.
> पोटाच्या तक्रारींसाठी फायदेशीर –
ज्या लोकांना अॅसिडीटी, गॅस आणि पचनाच्या समस्या आहेत, त्यांच्यासाठी शिळी चपाती हा खूप चांगला उपाय आहे. तसेच गव्हाच्या पोळीमध्ये असणारे फायबर अन्न पचनासाठी देखील सहायक आहे. ज्या व्यक्ती नियमित शारीरिक कसरत किंवा व्यायाम भरपूर करतात, अश्या व्यक्तींसाठी शिळ्या पोळीचे सेवन हे शरीराला त्वरित उर्जा देणारे आहे.
> ब्लड प्रेशरच्या समस्येवर उपाय –
आजकाल प्रत्येक तिसरी व्यक्ती ब्लड प्रेशरची शिकार आहे. जर का तुम्ही देखील ब्लड प्रेशरच्या समस्येने त्रस्त असाल तर शिळ्या चपातीला थंड दुधात 15 मिनिटे भिजवून खाण्याच्या ब्लड प्रेशर रुग्णांना फायदा होतो. तसेच उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये थंड दुधाबरोबर शिळ्या पोळीचे सेवन केल्याने उष्माघात होण्याचा धोका कमी संभवतो.
> मधुमेह –
शिळ्या पोळीचे सेवन केल्याने ब्लड ग्लुकोजची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते. विशेषतः ज्यांना मधुमेह आहे, त्यांच्यासाठी शिळी पोळी लाभदायक आहे. मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी सकाळच्या नाश्त्यामध्ये शिळी पोळी कुस्करून त्यामध्ये थंड दुध घालून खावी. साखरेचा वापर टाळावा.
> अशक्त शरीरासाठी फायदेशीर -
जर एखादा व्यक्ती अशक्त (सडपातळ) असेल तर त्याने शिळी पोळी सेवन केली पाहिजे यामुळे त्याचा अशक्तपणा दूर होईल आणि त्याच्या शरीरामध्ये शक्ती येईल. शरीराचा अशक्तपणा दूर करण्यासाठी शिळी पोळी खाणे हा एक चांगला उपाय आहे.