Happy Narali Purnima 2021 Images: नारळी पौर्णिमानिमित्त मराठमोळी HD Greetings, Wallpapers, Wishes शेअर करुन द्या सर्वांना शुभेच्छा!
Narali Purnima (Photo Credits-File Images)

Narali Purnima HD Images: नारळी पौर्णिमा (Narali Purnima) हा सण मासेमारी करणाऱ्या कोळी लोकांचा सण आहे. पावसाळ्यात समुद्र प्रचंड खवळलेला असतो. या काळात बोटी- जहाजांना समुद्रात जाऊ दिले जात नाही. समुद्राचा कोप होऊ नये, जहाजे, नौका सुरक्षित रहाव्यात, समुद्र शांत होण्यासाठी कोळी लोक या दिवशी समुद्राची पूजा केली जाते. या पूजेनंतर कोळी बांधव पुन्हा मासेमारीला सुरुवात करतात. कोळी बांधवाच्या या मोठ्या सणानिमित्त खालील दिलेले एचडी इमेज शेअर करून आनंदात आणि उत्साहात नारळी पौर्णिमा साजरी करा.

नारळी पौर्णिमेचा सण कोळी बांधव अत्यंत पारंपारिक पद्धतीने साजरा करतात. या दिवशी कोळी बांधव आपल्या पारंपारिक वेश परिधान करतात. दरम्यान, सर्व पुरुष कमरेला रुमाल अंगात टीशर्ट आणि डोक्यात टोपी घालतात. तर, स्त्रिया जरीचे कपडे परिधान करून सोन्याचे दागिने घालतात. हे देखील वाचा-Shravan Putrada Ekadashi 2021 Images: श्रावण पुत्रदा एकादशीच्या शुभेच्छा देण्यासाठी Greetings, WhatsApp Status , Photos!

नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा-

नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा-

नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा-

नारळी पौर्णिनेमिनित्त घरात नैवेद्यासाठी गोडाचे पदार्थ बनवतात. या पदार्थांमध्ये खासकरुन ओल्या नारळाच्या करंज्या, नारळी भात, नारळी पाक असे पदार्थ बनवले जातात. समुद्राची पूजा करण्यापूर्वी सर्वप्रथम नारळ मंदिरात ठेवून सर्व कोळी मंदिरांमध्ये एकत्र जमतात. त्यानंतर दर्याराजाला नारळ अर्पण करून आपले गाऱ्हाणे घालतात अशी वर्षानुवर्ष चालत आलेली परंपरा आहे.