श्रावण (Shravan) महिन्यातील शुक्ल पक्षाच्या एकादशीला पुत्रदा एकादशी (Putrada Ekadashi) म्हणून ओळखले जाते. आज (17 ऑगस्ट) पुत्रदा एकादशीचा दिवस आहे. पुराणातील कथांनुसार पुत्रदा एकादशीचं व्रत केल्यास मनुष्य पापांपासून मुक्त होतो तसेच इहलोकी सुखी होऊन परलोकी स्वर्गीय गतीला प्राप्त होतो. दरम्यान पुत्रदा एकादशीचं व्रत हे इच्छित फळ देणारे असल्याने अनेक जण श्रावण महिन्यातील पुत्रदा एकादशी पाळतात. आज तुमच्या परिवारातही नातलग, नातेमंडळी, प्रियजण हे पुत्रदा एकादशीचं व्रत पाळणार असतील तर त्यांना Facebook Messages, WhatsApp Status, Stickers च्या माध्यमातून शुभेच्छा देत आजचा दिवस खास करा. नक्की वाचा: Shravan Month 2021 in Maharashtra: महाराष्ट्रात श्रावणमासारंभ 9 ऑगस्ट पासून; श्रावणी सोमवार ते पोळा जाणून घ्या या पवित्र महिन्यातील सण, व्रतांच्या तारखा.
पुराणकाळात महिष्मतीपुरी नावाचा एक शांतीप्रिय, धर्मप्रिय असा एक राजा था. मात्र त्याला स्वत:च मूल नव्हतं. मग त्याच्या शुभचिंतकांनी एक लोमेश ऋषीला याचे कारण विचारले असता, त्यांनी सांगितले की, मागच्या जन्मी महिष्मतीपुरी राजा हा एक अत्याचारी, निर्दयी असा राजा होता. मागच्या जन्मी याच एकादशी दिवशी तहानलेला हा राजा पाणी पिण्यासाठी एक जलाशयाजवळ पोहोचला. तेव्हा तिथे नुकतीच बाळंतिण झालेली गाय पाणी पिण्यासाठी आली होती. मात्र राजाने तिला तेथून हटकले. त्याच्या ह्या दुष्कर्मामुळे तो याजन्मी पिता बनू शकणार नाही. त्यामुळे जर त्याला या शापातून मुक्त करायचे असेल तर, तुम्हाला हे व्रत करावे लागेल आणि त्याचे पुण्य तुमच्या राजाला द्यावे लागेल. तरच त्यांनी संततीप्राप्ती होईल. या ऋषीमुनींच्या निर्देशानुसार, प्रजासह राजानेसुद्धा हे व्रत केले. त्यानंतर काही काळानंतर राणीने एक गोंडस बाळाला जन्म दिला. तेव्हापासून एकादशीला श्रावण पुत्रदा एकादशीचे व्रत केले जाते.
पुत्रदा एकादशीच्या शुभेच्छा
आज पुत्रदा एकादशीच्या निमित्ताने महाराष्ट्रात पंढरपूरच्या विठ्ठल रखुमाईच्या मंदिराला फुलांची मनमोहक आरास करण्यात आली आहे. यंदादेखील कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यात प्रार्थनास्थळं बंद असल्याने मंदिरात जाऊन विठ्ठल-रखूमाईचं दर्शन घेणं शक्य नाही त्यामुळे सोशल मीडीयामधूनच आजच्या दिवसाचा आनंद द्विगुणित करा.