Happy Independence Day 2021 Images: भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त मराठमोळी HD Greetings, Wallpapers, Wishes शेअर करुन द्या देशभक्तांना शुभेच्छा!

Happy Independence Day HD Images: भारतात आज 75वा स्वातंत्र्य दिन साजरा केला जात आहे. या दिवशी स्वातंत्र्यवीरांना स्मरण करून संपूर्ण देशभरात ध्वजारोहन केले जाते. संपूर्ण भारतीयांसाठी हा दिवस खूप खास असतो. मात्र, आपण जे स्वातंत्र्य भोगतो आहे, यासाठी कित्येकांनी आपल्या प्राणांची अहुती दिली आहे. त्यानंतर 15 ऑगस्ट 1947 साली क्रांतीकारकांच्या रक्ताचे आणि कष्टाचे 15 ऑगस्ट 1947 साली चीज झाले आहे. सध्या संपूर्ण देशावर कोरोनाचे संकट वावरत आहेत. यामुळे यंदाही कोरोना निर्बंधांचे पालन करून स्वातंत्र्य दिन साजरा करावा लागणार आहे. मात्र, तरीही तुम्हाला घरबसल्या तुमचे नातेवाईक, मित्र-मैत्रीण यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देता येणार आहे. यासाठी खालील एचडी एमेजेस फायदेशीर ठरणार आहेत.

भारतात दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात योगदान असलेल्या सर्व ज्ञात-अज्ञात व्यक्तींचे कृतज्ञतापूर्वक स्मरण या दिवशी केले जाते. हे देखील वाचा- Independence Day 2021 Recipe: यंदा स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी घरच्या घरी बनवा 'या' कलरफुल रेसिपी 

फोटो-

फोटो-

फोटो-

भारतात सर्व ठिकाणी स्वातंत्र्य दिनाची सार्वजनिक सुट्टी दिली जाते. सर्व शाळा, महाविद्यालये-कार्यालयांमध्ये ध्वजारोहण व ध्वजवंदन असते. भारताचे पंतप्रधान हे दरवर्षी भाषण देतात. या दिवशी लाल किल्ला येथे भारताचे पंतप्रधान ध्वजारोहण करतात. त्यादिवशी बहुतांश रेडिओ केंद्रावर तसेच दूरदर्शनवर देशभक्तिपर गाणी, कार्यक्रम, चित्रपट लागतात.