Happy Gatari 2020 HD Images: यंदाच्या 'गटारी' निमित्त SMS, Wishes, Images, WhatsApp Status, Messages च्या माध्यमातून शुभेच्छा देऊन साजरा करा श्रावणापूर्वीचा हा दिवस
Gatari HD Images 2020 (Photo Credits: File Image)

हिंदू धर्मातील एक पवित्र महिना म्हणून श्रावण (Shravan 2020) कडे पाहिले जाते. यंदा 21 जुलै पासून राज्यात श्रावण महिना सुरु होत आहे. या काळात सर्वसामान्यपणे पूजा-अर्चना, देवाची भक्ती, तीर्थयात्रा अशा पुण्यदायक गोष्टी केल्या जातात. श्रावण सुरु होण्याआधी दीप अमावस्या म्हणजे आषाढ अमावस्या साजरी होते. दीप अमावस्येलाच गटारी अमावस्या (Gatari Amavasya 2020) असेही म्हणतात. बरेच लोक या दिवशी भरपूर मांस मच्छी खाऊन दारू पिण्याचे आयोजन करतात. या दिवसानंतर पवित्र श्रावण मास सुरू होतो. श्रावणात बहुतेक लोक कांदा लसूण व अभक्ष्य भक्षण बंद करतात, म्हणूनच संपूर्ण महिन्याभराची कसर गटारीच्या दिवशी या सर्व गोष्टी खाऊन काढली जाते.

गटारी म्हणजे नॉनव्हेजप्रेमींचा आवडीचा दिवस. श्रावणात मांसाहार वर्ज्य असल्याने, गटारीच्या दिवशी नॉनव्हेज खाणारे मच्छी, मटण, चिकनवर ताव मारतात. अनेकठिकाणी या दिवशी दारू पार्टीचे आयोजन केले जाते. काही लोक ‘हिंदू संस्कृतीला बदनाम करणारा दिवस’ असे म्हणूनही या दिवसाचा उल्लेख करतात. मात्र गटारी साजरी करणाऱ्या लोकांना त्याचे काही घेणे देणे नसते. तर अशा या गटारीच्या शुभेच्छा तुम्ही ग्रिटिंग्स, SMS, Wishes, Images, WhatsApp Status, HD Images च्या माध्यमातून देऊ शकता.

गटारीच्या स्पेशल पार्टीसाठी शुभेच्छा!

Happy Gatari 2020

गटारी अमावस्येच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy Gatari 2020

गटारीच्या खूप खूप शुभेच्छा!

Happy Gatari 2020

गटारीच्या चकणाभर शुभेच्छा!

Happy Gatari 2020

गटारीच्या क्वार्टरभर शुभेच्छा!

Happy Gatari 2020

(हेही वाचा: गटारी च्या शुभेच्छा देणारे मजेशीर मराठी संदेश, Wishes, Whatsapp Status वर शेअर करून मांसाहारी व मद्यप्रेमींना करा खुश)

दरम्यान, पावसाळ्यात मांसाहार केला जात नाही याला काही शास्त्रीय कारणेही आहेत, ती म्हणजे- पावसाळी वातावरणात मांसाहार पचत नाही, हा काळ बहुतेक प्राण्यांचा प्रजनन काळ असतो व याच काळात प्राण्यांची हत्या केली तर निसर्ग चक्रावरच विपरीत परिणाम होतो, अत्यंत दुर्मिळ आणि प्रकृतीला पोषक अशा अनेक भाज्या याच काळात उगवतात, म्हणूनही या काळात शाकाहाही जेवणाला प्राधान्य दिले जाते.