Layoffs In Swiggy? स्विगी कंपनीला मोठा आर्थिक तोटा; 5% कर्मचारी कपातीची शक्यता- रिपोर्ट
Swiggy (Photo Credits: PTI)

आर्थिक वर्ष 2022 (Fiscal Year 2022) मध्ये झालेल्या नुकसाणीमुळे ऑनलाईन फूड डिलीव्हरी कंपनी स्वीगी (Swiggy) मोठ्या अडचणीत आली आहे. ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म ( Online Food Delivery Platform) कंपनीच्या महसूलात 27% घसरण झाली आहे. आमच्या सहकारी वेबसाईटने दिलेल्या आकडेवारीनुसार पाठीमागील आर्थिक वर्षातील रु. 1,617 कोटींच्या तुलनेत स्विगीला FY22 मध्ये तोटा दुप्पट होऊन तो 3,629 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. कंपनीचा आर्थिक वर्ष 22 मध्ये एकूण खर्च 131 टक्क्यांनी वाढून 9,574.5 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. परिणामी स्वीगी कर्मचारी कपात करण्याची शक्यता आहे.

स्वीगीने रजिस्ट्रार ऑफ कंपनीज (RoC) सोबत जाहीर केलेल्या FY22 च्या आर्थिक ताळबंदाच्या शेवटच्या तिमाहीत कंपनीने Invesco च्या नेतृत्वाखाली Invesco च्या नेतृत्वाखाली $700 दशलक्ष फेरी उभारणी केली. स्विगीने "डेकाकॉर्न" ($10 अब्ज आणि त्याहून अधिक मुल्यांकनासह) बनवले.

दरम्यान, स्विगीचा महसूल FY22 मध्ये 2.2 पटीने वाढून 5,705 कोटी रुपयांवर पोहोचला आहे, जो FY21 मधील 2,547 कोटी रुपयांच्या घरात होता. Entrackr च्या मते, आउटसोर्सिंग सपोर्ट कॉस्ट कंपनीच्या एकूण खर्चाच्या 24.5 टक्के आहे. उल्लेखनीय असे की, कंपनीचा हा खर्च आर्थिक वर्ष 21 मधील रु 1,031 कोटींवरून FY22 मध्ये 2.3 पटीने वाढून 2,350 कोटी झाला. (हेही वाचा, Shocking! स्विगी आणि झोमॅटो डिलिव्हरी एजंट बनून ग्राहकांना ड्रग्जचा पुरवठा; आरोपीला अटक)

अहवालानुसार, आर्थिक वर्ष 22 मध्ये कंपनीची जाहिरात आणि प्रचार खर्च 4 पटीने वाढून 1,848.7 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. या सर्व घडामोडींनंतर गेल्या महिन्यात अहवाल समोर आला होता की स्विगी जानेवारीपासून 250 पेक्षा जास्त कर्मचारी किंवा 5 टक्क्यांपर्यंत कर्मचारी काढून टाकू शकते.

दरम्यान, स्विगीने म्हटले आहे की, आम्ही कोणतीही टाळेबंदी केलेली नाही. आम्ही आमचे लक्ष्य ऑक्टोबरमध्येच पूर्ण केले. त्यानुसार सर्व स्तरांवर रेटिंग आणि जाहीरातीही तयार आहेत. सर्व गोष्टी ठररेल्या वर्तुळानुसारच टप्प्याटप्याने पुढे जात असल्याचे स्विगी व्यवस्तापनाने एका निवेदनात म्हटले आहे.