Maharashtra Day 2023: आज महाराष्ट्रात मोठ्या उत्सवात स्थापना दिन (Maharashtra Day 2023) साजरा होत आहे. दरवर्षी 1 मे रोजी मोठ्या उत्साहात हा दिवस साजरा केला जातो. 1 मे 1960 रोजी बॉम्बे पुनर्रचना कायदा लागू झाला आणि बॉम्बेचे गुजरात आणि महाराष्ट्र या दोन राज्यांमध्ये विभाजन झाले. कच्छी आणि गुजराती बोलणारे लोक गुजरातचा भाग बनले, तर कोकणी आणि मराठी बोलणारे महाराष्ट्राचा भाग बनले. तेव्हापासून, या दोन राज्यांनी दरवर्षी 1 मे रोजी त्यांचा स्थापना दिवस साजरा केला. महाराष्ट्रातील लोक हा दिवस उत्साहात साजरा करतात आणि उत्सवाचा एक भाग म्हणून स्वादिष्ट महाराष्ट्रीयन पदार्थ तयार करतात. तुम्ही देखील महाराष्ट्र दिन 2023 निमित्त खास स्वादिष्ट महाराष्ट्रीयन पाककृतींचा आस्वाद घेऊ इच्छित असाल तर आम्ही तुमच्यासाठी खाली काही स्वादिष्ट पदार्थांचे व्हिडिओ घेऊन आला आहोत. तुम्ही हे व्हिडिओ पाहून खास महाराष्ट्रीन पदार्थ बनवू शकता. (Maharashtra Day 2023 Images: महाराष्ट्र दिन शुभेच्छा देण्यासाठी खास मराठी Wishes, Messages, HD Wallpapers, हायटेक युगात द्या डिजिटल सदिच्छा)
मिसळ पाव -
मिसळ पाव हा महाराष्ट्रातील स्ट्रीट फूडचा राजा आहे. मटकी असलेली करी, पाव यासह मिसळ दिली जाते. ही डिश बटाट्याची भाजी, शेव, फरसाण आणि इतर अनेक पदार्थांनी सजवली जाते.
पावभाजी -
उत्तर भारतातील लोकांना ही डिश खूप आवडते, पण ती महाराष्ट्रीयन जेवणाची डिश आहे. मऊ ब्रेड रोल्ससोबत दिलेली पावभाजी सर्वांनाच खूप आवडते.
कैरीची आमटी -
कैरीची आमटी ही कच्च्या आंब्यापासून तयार केली जाते. ही आमटी गोड, मसालेदार ग्रेव्ही आणि अस्सल भारतीय मसाल्यांचे मिश्रण आहे. हे वाफाळलेल्या पांढऱ्या तांदळासोबत सर्व्ह केले जाते आणि हे महाराष्ट्रीयन पदार्थांपैकी एक आहे.
पुरणपोळी -
पुरणपोळी महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थांच्या यादीत अव्वल आहे. ही पारंपारिक डिश हरभऱ्याची डाळ, नारळ, गूळ आणि जायफळ पावडर वापरून तयार केली जाते. सण आणि शुभ प्रसंगी महाराष्ट्रात पुरण पोळी करण्याची पद्धत आहे.
पांढरा रस्सा -
नारळाचे दूध, कांदा, काजू पेस्ट, मिरची आणि इतर मसाले टाकून पांढरा रस्सा बनवला जातो. ही एक अशी डिश आहे जी नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी एक परवणीच असते.
वरील व्हिडिओज पाहून तुम्ही महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून आज खास महाराष्ट्रीन डीशचा आस्वाद घेऊ शकता. सर्वांना महाराष्ट्र दिन 2023 च्या हार्दिक शुभेच्छा!