Lockdown मध्ये पाणीपुरी, शेवपुरी ला मिस करताय? यावेळी ट्राय करून पहा हेल्थी खाकरा चाट रेसिपी (Watch Video)
Khakhra Chat (Photo Credits: YouTube)

Khakra Chaat Recipe: काय मग खवय्ये मंडळी कसा सुरुये लॉक डाऊन (Lockdown) ? घरच्या घरी वेगवेगळ्या रेसिपीज ट्राय करून पाहताय की नाही? आज तुमच्यासाठी आम्ही एक अशीच खास रेसिपी घेऊन आलो आहोत. तुमच्यापैकी अनेकजण पाणीपुरी (Pani Puri), शेवपुरी (Shevpuri) वैगरे चाट प्रकार मिस करत असतील. करताय ना? अगदी झटपट बनणारा चटपटीत पदार्थ म्हणजे चाट, नुसती चवच नाही तर आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा चाट खाणे हे कधीही फायद्याचे मानले जाते, कमीत कमी तेलाचा वापर आणि कांदा टोमॅटो, काकडी असे पदार्थ आणि चटणी या मोजक्या सामग्रीत अगदी कमी वेळेत आणि घरच्या घरी सुद्धा चाट बनवता येते. या चाट ला आज थोडा ट्विस्ट देऊन आपण खाकरा चाट कसा बनवायचा हे आज पाहणार आहोत. Kalonji Masala Recipe Video: कलौंजी मसाला वापरून साध्या भाज्या सुद्धा करा लज्जतदार; जाणून घ्या 'या' मसाल्याची झटपट रेसिपी

गुजराती खवय्यांची ऑल टाइम फेव्हरेट डिश म्हणजे खाकरा. हा बनवण्यासाठी पिठामध्ये मीठ-मसाला, जिरेपूड, ओवा, हिंग आणि हवा तो फ्लव्हेअर ऍड करून त्याची पातळ पोळी बनवायची आणि मग ती तेलात तळून घ्यायची इतकी साधी सोप्पी रेसिपी आहे. याच खाकऱ्यावर चाट प्रमाणेच पदार्थ टाकून खाकरा चाट बनवता येतो. आता तो कसा यासाठी खाली दिलेला हा व्हिडीओ पहा.

खाकरा चाट रेसिपी

ही रेसिपी तुम्ही सुद्धा घरी नक्की ट्राय करून पहा आणि कशी झाली ते आम्हाला सुद्धा कळवा याशिवाय या लॉक डाऊन मध्ये तुम्ही बनवलेल्या काही हटके रेसिपीज सुद्धा आमच्योसबत शेअर करू शकता. यानिमित्ताने तुमची रेसिपी इतरांपर्यंत पोहचवण्याची  सुवर्णसंधी तुम्हाला मिळू शकते.