Kalonji Masala Recipe In Marathi: लॉक डाऊन (Lockdown) सुरु झाल्यापासून अनेकांमधला सुप्त शेफ जागा झाला आहे. तुम्हीही आतापर्यंत वेगवेगळ्या रेसिपीज ट्राय करून पहिल्याच असतील हो ना? पण आता जवळपास चार महिने होत आले तरी लॉक डाऊन संपायचं काही नाव नाही अशात आता किचन मध्ये आणखीन काय नवीन प्रयोग करू असा प्रश्न सुद्धा अनेकांना पडला असेल. आज आम्ही आपल्यासाठी या प्रश्नाचं उत्तर घेऊन आलो आहोत. आपल्या घरात बनणाऱ्या रोजच्याच भाज्यांना वेगळा टच देता येईल असा कलौंजी मसाला (Kalonji Masala) कसा बनवायचा हे आपण पाहणार आहोत. मुळात कलौंजी म्हणजे काय तर? हा एक मसाल्याचा पदार्थ आहे. या काळ्या रंगाच्या बिया असतात, ज्याला नीलला सतीवा, कलौंजी किंवा ब्लॅक जिमिन म्हणूनही ओळखले जाते. कलौंजीच्या बिया आणि घरातच उपलब्ध असतील असे काही अन्य मसाल्याचे पदार्थ मिक्स करून घरीच कसा हा मसाला बनवायचा हे जाणून घ्या.
कलौंजी बाबत एक विशेष बाब म्हणजे केवळ जिभेचे चोचले पुरवायलाच नव्हे तर आरोग्यासाठी सुद्धा हा मसाला खूप फायद्याचा आहे. अगदी वजन कमी करण्यापासून ते मासिक पाळीच्या दरम्यान होणारा त्रास कमी करण्यासाठी याचा खूपच फायदा होतो. अशा या बहुगुणी मसाल्याची सोप्पी रेसिपी जाणून घ्या.
कलौंजी मसाला
साहित्य:
- धणे 1/2 कप
- बडीशेप 1/4 कप
- जिरे 1/4 कप
- मेथीचे दाणे 1 Tea Spoon
- लाल मिरची 6-8
- काळी मिरी 7-8
- आमचूर पावडर 2 Tea Spoon.
रेसिपी :
आमचूर पावडर वगळता आपण जमा केलेले हे सर्व मसाले गरम तव्यावर भाजून घ्या, एकदा मिक्सर मध्ये वाटून घ्या, आणि मग त्यात आमचूर पावडर घाला आणि चमच्याने मिक्स करा. थंड झाल्यावर हवाबंद डब्ब्यात भरून ठेवा.
पहा व्हिडीओ
आपण हा मसाला वापरून अगदी साध्या भाज्यांना सुद्धा वेगळाच फ्लेव्हर देऊ शकता, विशेषतः कारले, वांगी, बटाटा, भेंडी या भाज्यांसाठी हा मसाला वापरला जातो. ज्या पद्धतीने आपण भरलेली वांगी करतो त्याच पद्धतीने केवळ हा कलोंजी मसाला भरून आपल्याला या भाज्या बनवता येतील