नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या उपवासात रोज काय बनवावे हा प्रश्न अनेकींना पडतो. पण आता ही चिंता नको. कारण तुमच्यासाठी घेऊन आलोय खास उपवासाची रेसिपी. राजगिऱ्याचे डोसे. झटपट होणारा चविष्ट पदार्थ कोणाला आवडणार नाहीत? तर मग पाहुया राजिगऱ्याच्या डोशांची रेसिपी... उपवासाला असे बनवा साबुदाण्याचे स्प्रिंग रोल्स !
साहित्य
दोन वाट्या राजगिऱ्याचे पीठ
२-३ मिरच्या
मीठ
एक टिस्पून जिरे
एक उकडलेले रताळे
तूप
आवडीनुसार पाणी किंवा ताक
कृती
- मिरच्या, मीठ व जिरे मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावेत.
- उकडलेले रताळे कुस्करून राजगिऱ्याच्या पीठात मिसळावे.
- यात मिक्सरमध्ये बारीक केलेले मिश्रण घालावे.
- पाणी किंवा ताक मिसळून डोशाच्या पिठाप्रमाणे पीठ तयार करावे.
- नॉनस्टिक पॅनवर तूप टाकून डोसे तयार करावेत.
- तयार झालेले स्वादिष्ट डोसे दह्याबरोबर खावेत.
- तुमच्या आवडीनुसार या डोशामध्ये भाजलेले शेंगदाणे व बटाटा मिसळू शकता. राजगिऱ्याच्या पीठाबरोबर डोशामध्ये साबुदाण्याचे पीठ घातल्यासही पोष्टीक डोसा तयार होतो.
-डोशाबरोबर दह्याऐवजी खोबऱ्याची चटणीही चविष्ट लागते.
उपवासाठी झटपट होणारे खजूराचे लाडू हा देखील एक उत्तम पर्याय आहे.