Puran Poli Recipe: शालिवाहन शक वर्षातील शेवटचा महिना म्हणजे 'फाल्गुन'. फाल्गुन पौर्णिमेच्या (Phalgun Purnima) दिवशी होळीचा सण (Holi) साजरा कला जातो. नव्या वर्षासाठी, वसंत ऋतूच्या आगमनासाठी निसर्गासोबतच आपणही सज्ज असतो. झाडांची झालेली पानगळ आणि मनातील विनाशी विचारांचा निचरा करण्यासाठी होळी पेटवली जाते. पण होळीचा सण हा रंगांशिवाय जसा अपूर्ण आहे तसाच तो खवय्यांसाठी पुरणपोळी (Puran Poli) आणि कटाची आमटीशिवायही पूर्ण झाल्यासारखा वाटत नाही. मग आदिवासी भागातील होळी असो, कोळी बांधवांचा सण असो किंवा कोकणातील शिमगोत्सव... होळी पेटवताना पुरणपोळी बनवण्याची प्रथा आहे. Holika Dahan 2019: हुताशनी पौर्णिमा दिवशी होळी का पेटवली जाते? यंदा होलिका दहन करण्याचा मुहूर्त काय?
आज इन्स्टंट फूडच्या जमान्यात विकतची पुरणपोळी आणली जाते किंवा रेडी टू इट पुरणपोळी मिक्स आणून पोळ्या बनवल्या जातात. पुरणपोळी हा पदार्थ सुरगणींच्या पाककौशल्याचा कस लावणारा एक पदार्थ आहे. त्यामुळे अनेकजण तो बनवताना घरातील मोठ्यांचा सल्ला घेतात पण आजकाल धावपळीच्या बनलेल्या आपल्या जीवनशैलीमध्ये पुरण बनवनं आणि पुरणयंत्रातून वाटणं ही वेळखाऊ प्रक्रिया टाळून लुसलुसीत पुरणपोळी बनवायची असेल तर युट्युब वर काही सुगरणींनी खास सल्ला शेअर केला आहे. त्यामुळे तुमच्या वेळेची बचत करण्यासाठी हे व्हिडिओ नक्की पाहून यंदा पुरणपोळीचा बेत बनवा.
न वाटता पुरणपोळीचं पुरण बनवण्यसाठी खास टीप्स
पुरण बनवण्याची हटके स्टाईल
विष्णू मनोहरच्या टीप्स
पुरणपोळी ही गरमागरम खाण्याची मज्जा काही औरच आहे. काही जण दूधासोबत, काही जण केवळ तूपाच्या धारेसोबत तर काही जण तिखट कटाच्या आमटीसोबत पुरणपोळींवर ताव मारतात.