Diwali 2019: शकुंतला नरे, निखील राऊत, स्नेहलता वसईकर या मराठी सेलिब्रिटींचा पहा हटके फराळाचा पदार्थ (watch video)
Nikhil Raut,snehlata vasaikar, Shakuntala nare (Photo credit - You tube )

Diwali 2019: दिवाळी जवळ येऊ लागली की घराघरात तयारी सुरू होते. शुटिंगच्या धावपळीत दिवाळीच्या तयारीसाठी वेळ काढताना सगळ्यांचीच दमछाक होते. काही कलाकार मंडळीही वेळात वेळ काढून दिवाळीच्या फराळाला लागली आहेत. काही कलाकार वेगळ्या पद्धतीने दिवाळीचा फराळ बनवत आहेत. तुम्हालाही या नव्या पद्धतीने फराळातील काही पदार्थ बनवायचे असतील तर आम्ही तुमच्यासाठी काही कलाकारांचे विशेष व्हिडिओ घेवून आलो आहोत. चला तर मग पाहुयात या सेलिब्रिटींनी कोणता पदार्थ बनवला आहे. (Diwali 2019 Faral Ideas: पनीर करंजी ते सँडविच शंकरपाळी सह यंदाचा दिवाळी फराळ करा खास; पहा झटपट रेसिपीज)

खाजाच्या करंज्या –

दिवाळीच्या फराळात करंजी करण्याच्या पद्धतीमध्ये थोडे बदल करून खाजाच्या करंज्या किंवा खाजाचे कानवले हा प्रकार करता येईल. रात्रीस खेळ चालेल या मराठी मालिकेतील अभिनेत्री शकुंतला नरे यांनी स्पेशल खाजाच्या करंज्या बनवल्या आहेत. शकुंतला या रात्रीस खेळ चाले या मालिकेत माई या नावाची भूमिका करतात. माईंनी अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला खाजाच्या करंज्या करून दाखवल्या आहेत. तुम्हालाही खाजाच्या करंजा बनवायच्या असतील तर खालील व्हिडिओ नक्की पहा.

सातपुडा –

काहे दिया परदेस या मालिकेतील अभिनेता निखील राऊत याने आपल्याला आज नवीन पदार्थ करुन दाखवला आहे. या पदार्थाच नाव आहे ‘सातपुडा’. सातपुरा हा सिंधी पदार्थ आहे. या पदार्थाला ‘सातपुरा’ किंवा ‘सातपुडा’ असंही म्हंटल जात. दिवाळीच्या दिवसात आपण फराळ बनवतो. परंत, त्यामध्ये काही वेगळा पदार्थ काहीतरी वेगळं ट्राय करायची इच्छा असेल तर सातपुडा नावाचा पदार्थ नक्की करून बघा.

खजूराची बर्फी –

अभिनेत्री स्नेहलता वसईकर हिने आपल्याला आज एक नवीन गोड पदार्थ करून दाखवला आहे. तिने खजूरापासून बर्फी बनवली आहे. ही बर्फी बनवणं अगदी सोप आहे. तुम्ही खालील व्हिडिओ पाहुन अगदी सोप्या पद्धतीने खजूराची बर्फी बनवू शकता.

फराळ चवीला जितका लज्जतदार लागतो तितकीच मेहनत तो पदार्थ बनवण्यासाठी घ्यावी लागते. वरील व्हिडिओमध्ये कलाकारांनी लेटेस्ट ली मराठीसोबत खास गप्पा मारल्या आहेत. यात त्यांनी विविध भूमिका करताना आलेले अनुभवही शेअर केले आहेत.