Mangoes (Photo Credits: Instagram, File)

उन्हाळ्यात मनसोक्त आंब्यावर ताव मारणे हा प्रत्येक आंबाप्रेमींचा जन्मसिद्ध हक्क असतो असं म्हणायला हरकत नाही. त्यात हापूस आंबा म्हणजे प्रचलित आणि लोकप्रिय अशी आंब्याची जात. हा हापूस आंबा चाखायला मिळणे म्हणजे पर्वणीच. मात्र हापूस आंब्याशिवाय आणखी ब-याच आंब्याच्या जाती आहेत ज्या चवीलुळ आणि रसाळ असतात. अनेकांना कदाचित त्या आंब्याविषयी माहिती नसेल. मात्र हा आंबा पिकवणा-या कोकणी माणसाला मात्र या आंब्यांची ब-यापैकी माहिती असेल. आंबा खरेदी करताना हापूस आंबा घ्यायचाय हा एकच विचार डोळ्यासमोर असतो.

मात्र बाजारात अशाही आंब्याच्या जाती आहेत ज्या खूप रसाळ आणि मधुर असतात. त्या प्रकाराबाबत तुम्हाला माहिती मिळाली तर तुम्ही एकदा तरी या आंब्याची चव चाखाल याची आम्हाला खात्री आहे. मात्र हे आंबे ओळखायचे कसे?

जाणून घ्या आंब्याच्या या जातींविषयी:

1. केसर

या आंब्याला केसरी रंग असतो. हे आंबा चवीला फार गोड असून हे आंबे 5-6 दिवस टिकतातत.

Kesar Photo Credits: File)

2. रायवळ

या आंब्याच्या फोडी करून खाता येत नाही. हा आंबा चोखून खायचा असतो. हा आंबा आकाराने लहान असतो. आंबा खरेदी करताना कोणत्या गोष्टींना द्यावे प्राधान्य? वाचा सविस्तर

3. रत्ना

हा हापूस आंब्याचा एक प्रकार असून हा आंबा आकाराने मोठा असतो. याची चव हापूस सारखी नसली तरी चविष्ट असतो.

4. तोतापुरी

हा आंबा आकाराने लांबट आणि पिवळसर हिरव्या रंगाचा असतो. याच्या दोन्ही टोके निमुळती असतात.

Totapuri (Photo Credits: Instagram)

5. पायरी

हा मध्यम आकाराचा आणि लालसर हिरव्या रंगाचा आंबा असतो. मात्र हा आंबा पिकल्यावर जास्त काळ टिकत नाही. आंबा खाताना 'या' गोष्टींच्या घ्या काळजी अन्यथा शरीरावर होतील दुष्परिणाम

6. दशेरी

या आंब्याचा रंग पिवळा, शेंदरी असतो. हा आंबा कापून खाता येतो.

7. सिंधू

हा रेषाविरहीत आंबा असून लालसर रंगाचा असतो. यातील कोय आकाराने फार लहान असते.

8. नीलम

हा आंबा उशिरा तयार होतो मात्र हा अन्य सीझनमध्येही मिळतो.

9.रत्नागिरी हापूस

रत्नागिरी हापूस ला अन्य आंब्यापेक्षा कमी सुगंध येतो. हा आंबा पिकल्यावर पिवळा धम्मक होतो.

Hapus (Photo Credits: FIle)

10. देवगड हापूस

या आंब्याला अधिक सुगंध येतो. हा पिवळसर आणि काहीसा केसरी रंगाचा असतो.

कोणतेही सीजनल फळे त्या त्या सीझनमध्ये खाल्ली तर त्याचा शरीरावर कोणताही दुष्परिणाम होत नाही. त्यामुळे हे वेगवेगळ्या जातीचे आंबे यंदाच्या उन्हाळ्यात नक्की ट्राय करा.