Christmas 2019 Special Easy Recipes: स्पॉंज केक, कुकीज पासुन ते टेस्टी डोनट पर्यंत यंदा 'या' सोप्प्या रेसिपी ट्राय करुन वाढ्वा ख़्रिसमसची शान (Watch Video)
Christmas Cookies Cake Chocolates Donuts Recipes (Photo Credits: Instagram)

Christmas 2019: भारतात प्रत्येक सणाच्या मुहूर्तावर वेगळी रेसिपी बनवण्याची पद्धत सर्वच संस्कृतीत फार पूर्वीपासून फॉलो केली जाते,  खाऊन पिऊन सण साजरे करणे ही जणू काही आपली परंपराच आहे. आता काहीच दिवसात  ख्रिसमस सेलिब्रेशनला (Christmas Celebration)   सुरुवात होईल. जगभरात हा सण अगदी जोरदार सेलिब्रेट केला जातो. विशेष म्हणजे ख्रिसमस पार्टीच्या दिवशी सुद्धा एकापेक्षा एक मेजवान्यांचा बेत केला जातो. प्रभू येशूच्या (Jejus) जन्मदिनाचा हा सण गोडाधोडाचे पदार्थ बनवून साजरा केला जातो.  यामध्ये सुद्धा केक (Cake), कुकीज (Cookies), डोनट्स (Donuts) या पदार्थांना विशेष पसंती असते. खरंतर हे पदार्थ बनवण्यासाठी मेहनत लागत असल्याने  सहसा बाजारातून हे सगळे पदार्थ घरी आणण्याकडे सर्वांचा कल असतो. पण यंदा काहीतरी हटके करण्याच्या विचारात असाल तर थोडा वेळ काढून हे ख्रिसमस स्पेशल पदार्थ तुम्ही नक्की बनवून पाहू शकता..Christmas 2019: नाताळ सण साजरा करण्यामागची 'ही' कथा तुम्हाला माहित आहे का?

साहजिकच यासाठी तुम्हाला थोडी सवड असायला हवी पण नेहमीपेक्षा अगदी कमी वेळ लागेल अशा काही रेसिपी आज आम्ही आपणाला सांगणार आहोत. या ख्रिसमसला घरी तुम्ही हे पदार्थ करून आपल्या फ्रेंड्स नातेवाईक आणि पाहुण्यांना एक गोड ख्रिसमस गिफ्ट देउ शकता...

व्हॅनिला स्पॉंज केक

शुगर कुकीज

स्टफ्फ्ड डोनट

गोवा स्पेशल कलकल

चॉकलेट फज

चॉकलेट कोकोनट लाडू

या सगळ्या रेसिपीज मध्ये खाण्याचा लाल, हिरवा किंवा पांढरा रंग वापरून तुम्ही ख़्रिसमस स्पेशल टच देउ शकता,आणि हो..हे पदार्थ करुन पाहिल्यावर कसे झाले हे आम्हाला कळवायला विसरु नका.