Water Day | File Image

पाणी हे जीवन आहे. या पृथ्वीवर जीवनाचं रहाटगाडगं सुरू राहण्यासाठी पाणी आवश्यक आहे. त्यामुळे पाण्याचं महत्त्व अधोरेखित करण्याच्या उद्देशाने दरवर्षी 22 मार्चला World Water Day साजरा केला जातो. या दिवसाचं औचित्य साधत पाण्याच्या संसाधानांचा शाश्वत विकास आणि नियोजन करण्याचं महत्त्व सांगितलं जातं. जगभर पाणी किती महत्त्वाचं आहे आणि त्याचा अपव्यय टाळण्यासाठी काय करावं? यासाठी विविध स्तरावर कार्यक्रम आयोजित केले जातात. मग या जागतिक जल दिनानिमित्त खास WhatsApp Status, Facebook Messages, Quotes, Photos तुमच्या मित्रमंडळी, नातेवाईकांना पाठवून पाणी वाचवण्याचं महत्त्व अधोरेखित करा.

यंदा जागतिक जल दिन Glacier Preservation (हिमनदी संवर्धन) या थीमवर साजरा केला जाणार आहे. जगात हिमनद्यांचे संरक्षण करण्याची गरज निर्माण झाली आहे. हिमनद्या जलद वितळण्यामुळे जल सुरक्षा, परिसंस्था आणि उपजीविका धोक्यात येत आहे, ज्यासाठी ग्लोबल आणि लोकल अ‍ॅक्शन आवश्यक आहे.

जागतिक जल दिनाच्या शुभेच्छा

  • थेंब थेंब वाचवा पाण्याचा हाच मार्ग आहे सुखी भविष्याचा

Water Day | File Image

  • बचत पाण्याची गरज काळाची

Water Day | File Image

  • पाणी वापरा जपून म्हणजे भविष्य राहणार टिकून

Water Day | File Image

  • पाणी वाचवण्याचा ध्यास, भविष्याचा होईल विकास

Water Day | File Image

  • पाणी वाचवल्याने होईल फायदा मिळेल सर्वांना जलसंपदा

Water Day | File Image

पृथ्वीवर प्रत्येकाला स्वच्छ पिण्याचे पाणी मिळावे यासाठी सुरू असलेल्या कामावर प्रकाश टाकण्यासाठी 1993 पासून जागतिक जल दिन साजरा केला जात आहे.