Happy World Music Day 2022 Messages (PC - File Image)

Happy World Music Day 2022 Messages: संगीत हा आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे जो केवळ मनाला शांती देत ​​नाही तर आपल्याला आनंदी ठेवण्यासाठीही महत्त्वाची भूमिका बजावतो. अशा परिस्थितीत दरवर्षी जागतिक संगीत दिन साजरा केला जातो. हा दिवस 21 जून रोजी साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश लोकांना संगीताचे महत्त्व सांगणे हा आहे.

21 जून 1982 रोजी प्रथमच जागतिक संगीत दिन फ्रान्समध्ये साजरा करण्यात आला. फ्रान्सचे सांस्कृतिक मंत्री मॉरिस फ्ल्युरेट यांनी सर्वांसमोर जागतिक संगीत दिन साजरा करण्याचा प्रस्ताव ठेवला होता, जो 1981 मध्ये मान्य करण्यात आला होता. त्यानंतर, फ्रान्सचे पुढील सांस्कृतिक मंत्री जॅक लँग यांनी 1982 मध्ये दरवर्षी जागतिक संगीत दिन साजरा करण्याची घोषणा केली. जागतिक संगीत दिनानिमित्त Wishes, Greeting, Whatsapp Status, Images च्या माध्यमातून संगीत प्रेमींना शुभेच्छा नक्की द्या. यासाठी तुम्ही खालील ईमेज डाऊनलोड करू शकता. (हेही वाचा - Yoga Poses to Cure Diabetes: मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी दररोज करा 'हे' 5 योगासन, Watch Video)

शब्दाशिवाय भावना पोहोचविण्याचे सामर्थ्य संगीतामध्ये आहे. सर्व संगीत प्रेमींना

जागतिक संगीत दिनाच्या

खूप खूप शुभेच्छा...!

Happy World Music Day 2022 Messages (PC - File Image)

संगीत अनमोल आहे,

त्याशिवाय जीवन अकल्पनीय आहे.

सर्वांना जागतिक संगीत दिनाच्या शुभेच्छा!

Happy World Music Day 2022 Messages (PC - File Image)

ज्याच्याकडे संगीताचा अद्भुत संग्रह आहे,

तो सर्वात श्रीमंत आणि आनंदी व्यक्ती आहे

सर्वांना जागतिक संगीत दिनाच्या शुभेच्छा!

Happy World Music Day 2022 Messages (PC - File Image)

सर्व संगीतकार, गायक, गीतकार

आणि संगीतावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला

जागतिक संगीत दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!

Happy World Music Day 2022 Messages (PC - File Image)

संगीताशिवाय जीवन हे मीठाशिवाय चव नसलेल्या अन्नासारखे आहे. तुम्हा सर्वांना जागतिक संगीत दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!

Happy World Music Day 2022 Messages (PC - File Image)

माझी सकाळ संगीताने सुरू होते

माझी रात्र संगीताने संपते

संगीताशिवाय माझे जीवन

आई-वडिलांशिवाय मुलासारखे आहे

जागतिक संगीत दिनाच्या शुभेच्छा!

Happy World Music Day 2022 Messages (PC - File Image)

जागतिक संगीत दिनानिमित्त संगीत क्षेत्राशी निगडीत महान गायक आणि संगीतकारांना सन्मानित केले जाते. अशा परिस्थितीत जगभरातील ठिकाणी संगीताशी संबंधित कार्यक्रम आयोजित केले जातात, ज्यात संगीतकार आणि गायकांना सन्मानित केले जाते.