Photo Credit - File Image

World Milk Day 2021 Wishes:आज 1 जून. जागतिक दुग्ध दिन (World Milk Day). आज जगभरात जागतिक दूध दिवस (World Milk Day) साजरा केला जातो. दूध हा एक जीवनावश्यक घटक मानला जातो. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनाच दूधाची आवश्यकता असते. पाण्यानंतर कदाचित अधिकृतरित्या प्यायला जाणारा दूध हाच एकमेव पदार्थ असावा. पण, असे असले तरी जसे निसर्गात मोफत मिळत असूनही अनेकांना मिळत नाही. त्याच पद्धतीने दूधही अनेकांना मिळत नाही. खास करुन बालके, महिला आणि वृद्ध नागरिकांना. मानवी शरीराला दुधाची असलेली गरज आणि त्याचे महत्त्व पटवून देण्यासाठीच जागतिक दूध दिन साजरा केला जातो.जागतिक अन्न व कृषी संशोधन परिषदेच्या निर्देशानुसार 2001 पासून दरवर्षी 1 जून रोजी संपूर्ण जगात दूध दिवस साजरा केला जातो. अनेक देशांमध्ये 1 जून रोजीच दुग्ध दिवस साजरा केला जात असे. त्यामुळे 2001 सालापासून 1 जून या तारखेलाच दूध दिन साजरा करण्यात येऊ लागला.

हा दिवस साजरा करण्याचा उद्देश दुधाच्या सर्व पैलूंच्या बाबतीत सामान्य जनतेमध्ये जागरुकता पसरवणं आणि वाढवणं असा आहे. तसंच लोकांना दुधाच्या बाबतीत अधिक ज्ञान मिळू शकेल, जेणेकरुन दुधाचं आपल्या आयुष्यातील महत्त्व लोकांना पटेल.दूध हा पदार्थ आपल्या आयुष्यात महत्त्वाचे आहे. कारण, ते मानवी शरीराला आवश्यक असे महत्त्वाचे घटक उपलब्ध करुन देऊ शकतो. दूधामध्ये मानवी शरीरास पोषख असे अनेक घटक असतात. आजच्या दिवशी दुधासंबंधी काही जून  आठवणीतले स्लोगन आपण शेअर करायलाच हवेत.

Photo Credit - File Image

Photo Credit - File Image
Photo Credit - File Image
Photo Credit - File Image

हा दिवस साजरा करण्यासाठी, जागतिक दूध दिवस 2021 आठवणीतले स्लोगन शेअर करुन आपल्या मित्र मैत्रिणींना पण पाठवू शकता.