World Health Day | File Image

जागतिक आरोग्य दिन (World Health Day) हा दरवर्षी 7 एप्रिल 2025 दिवशी साजरा केला जातो. दरवर्षी हा दिवस आरोग्याशी निगडीत एका विशिष्ट थीम वर आधारित संकल्पनेवर साजरा करण्याची रीत आहे. यंदा 'Healthy beginnings, hopeful futures' या थीमवर जागतिक आरोग्य दिन साजरा केला जाणार आहे. सरकार आणि हेल्थ कम्युनिटीने प्रतिबंधित माता आणि नवजात मृत्यू थांबवण्यासाठी प्रयत्न वाढवावेत आणि महिलांचे दीर्घकालीन आरोग्य आणि कल्याण यांना प्राधान्य द्यावे असे आवाहन केले आहे. कोविड संकटातून बाहेर आल्यानंतर आता जग स्थिर स्थावर होत असताना आरोग्याकडे आणि आरोग्य निगडीत यंत्रणेकडे लक्ष देणं आवश्यक असल्याची जाणीव होत आहे. त्यामुळे या दिवसाचं महत्त्व अधोरेखित करताना तुमच्या मित्र मैत्रिणींना, नातेवाईकांना, आप्तेष्टांना WhatsApp Messages, Status, Facebook Messages यांच्या द्वारा मेसेज करून या त्यांना निरामय आयुष्याच्या शुभेच्छा द्या.

जागतिक आरोग्य दिन हा WHO च्या स्थापनेचा दिवस म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली. 1948 मध्ये, जगभरातील राष्ट्रांनी एकत्र येऊन WHO ची स्थापना केली. दोन वर्षांनंतर, 1950 मध्ये, पहिला जागतिक आरोग्य दिन 7 एप्रिल रोजी साजरा करण्यात आला. तेव्हापासून दरवर्षी जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो.

जागतिक आरोग्य दिनाच्या शुभेच्छा

निरोगी आरोग्या विना वैभव असे व्यर्थ

पोषक आहार, शांत झोप अन व्यायामाने करू जीवन सार्थ

जागतिक आरोग्य दिनाच्या शुभेच्छा

World Health Day | File Image
जागतिक आरोग्य दिनानिमित्त तुम्हा सार्‍यांना निरोगी आरोग्य आणि दीर्घायुष्य  लाभो हीच प्रार्थना!
World Health Day | File Image
आरोग्यम धनसंपदा
आरोग्य दिनाच्या शुभेच्छा
World Health Day | File Image
आनंदी रहा
निरोगी रहा
आरोग्य दिनाच्या शुभेच्छा!
World Health Day | File Image

बदलत्या काळानुसार, आरोग्य समस्या आणि त्यांच्या फैलाव होताना दिसत आहे. प्रचंड प्रतिकारशक्ती असणारे विषाणू (व्हायरस) आरोग्याची समस्या अधिक गंभीर बनवत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर यासाठी विशिष्ट प्रकारचे धोरण असणे अत्यंत आवश्यक आहे. विभिन्न वंशांच्या समस्या वेगळ्या असं वाटत असलं तरी सारे मानव एक या न्यायाने आरोग्य समस्या आणि त्यावर उपाय हे साधारणपणे समान आहेत. माता आणि बाळांचे आरोग्य हे निरोगी कुटुंब आणि समुदायांचा पाया आहे, जे आपल्या सर्वांसाठी आशादायक भविष्य सुनिश्चित करण्यास मदत करते. म्हणूनच त्यांच्याकडे लक्ष देण्याचे यंदा आवाहन केले जाणार आहे.