Mahila Din | File Image

8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन (Women's Day )म्हणून साजरा केला जातो. लिंग समानता, पुनरुत्पादक हक्क, महिलांवरील हिंसा आणि अत्याचार यासारख्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्याच्या उद्देशाने जागतिक महिला दिन साजरा केला जातो. आज महिला केवळ चूल आणि मूल पुरती मर्यादित राहिली नसून जगात विविध स्तरांवर आपली स्वतंत्र ओळख निर्माण करत आहे. अनेकजणींनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आपल्या नावाचा ठसा निर्माण केला आहे. समाजासाठी अशाच काही आदर्श ठरलेल्या महिलांकडून प्रेरणा घेत तुम्ही देखील तुमच्या मैत्रिणी, आप्तेष्टांना शुभेच्छा देत हा दिवस खास करू शकता. महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही हे काही सेलिब्रिटी महिलांचे कोट्स शेअर करू शकता. WhatsApp Messages, Facebook Messages, Status द्वारा हे काही Quotes तुम्ही नक्कीच शेअर करू शकता. नक्की वाचा: Happy Women's Day 2025 Wishes In Marathi: जागतिक महिला दिनानिमित्त Messages, Wallpapers, WhatsApp Status पाठवून द्या शुभेच्छा! 

समाजवादी महिला परिषदेत, 8 मार्च 1908 रोजी अमेरिकेतील स्त्री-कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ, 8 मार्च हा `जागतिक महिला-दिन' म्हणून स्वीकारावा असा ठराव पास झाला. 1977 साली संयुक्त राष्ट्र संघटनेच्या समितीने विविध सदस्यांना आमंत्रित करून 8 मार्च हा आंतरराष्ट्रीय स्तरावर महिलांचे अधिकार आणि जागतिक शांतता या हेतून साजरा करवा यासाठी आवाहन केले. भारतात मुंबई मध्ये पहिला महिला दिवस 8 मार्च 1943 रोजी साजरा करण्यात आला.

महिला दिनाच्या शुभेच्छा

Mahila Din | File Image
Mahila Din | File Image
Mahila Din | File Image
Mahila Din | File Image
Mahila Din | File Image

 

 

"For ALL Women and Girls: Rights. Equality. Empowerment" या थीमवर यंदाचा जागतिक महिला दिन सर्वत्र साजरा केला जाणार आहे.