Sambhaji Maharaj Balidan Din 2023 HD Images: धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची पुण्यतिथी म्हणजेच 11 मार्च हा दिवस बलिदान दिन म्हणून पाळला केला जातो. छत्रपती संभाजी राजे हे मराठा सम्राट आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे उत्तराधिकारी होते. त्यांनी शिवाजी महाराजानंतर मराठा स्वराज्याचे रक्षण केले. संभाजी राजे त्यांच्या शौर्यासाठी प्रसिद्ध होते.
संभाजी राजे यांनी त्यांच्या अल्पशा कारकिर्दीत 210 युद्धे लढली. विशेष म्हणजे या लढायांमध्ये सैन्याचा एकाही युद्धात पराभव झाला नाही. संभाजी महाराजांच्या शौर्याने व्यथित होऊन औरंगजेबाने छत्रपती संभाजी राजे पकडले. 11 मार्च 1689 रोजी औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांची अत्यंत क्रूरपणे हत्या केली. छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्त Wishes, Messages, Greetings, Quotes द्वारे तुम्ही शंभूराजेंच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करू शकता. यासाठी तुम्ही खाली ईमेज डाऊनलोड करू शकता.
महापराक्रमी, धर्मवीर
छत्रपती संभाजी महाराज यांना
पुण्यतिथीनिमित्त त्रिवार मानाचा मुजरा!
शौर्याचा सर्वोच मानबिंदू,
छत्रपती संभाजी महाराज यांना
स्मृतिदिनानिमित्त, त्रिवार वंदन!
हिमालयाएवढे शौर्य असलेले,
महापराक्रमी संभाजी महाराज
यांना स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन..!
छत्रपती संभाजी महाराज,
यांच्या बलिदान दिनानिमित्त,
विनम्र आदरांजली !
हिंदुत्वाचे महान रक्षक धर्मवीर,
छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मृतीस
विनम्र अभिवादन..!
देव, देश आणि धर्मासाठी बलिदान देणाऱ्या
छत्रपती संभाजी महाराजांना
बलिदान दिनानिमित्त मानाचा मुजरा…
वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षी संभाजी महाराजांनी बुधभूषण, नायिकाभेद आणि सातशतक हे तीन संस्कृत ग्रंथ लिहिले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर काही लोकांनी छत्रपती संभाजी महाराजांचे धाकटे बंधू राजाराम यांना गादीवर बसवण्याचा प्रयत्न केला.