
Happy Valentine's Day Wishes In Marathi: व्हॅलेंटाईन वीक 7 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी 2025 पर्यंत साजरा केला जाईल. व्हॅलेंटाईन डेचा संपूर्ण आठवडा प्रेमी युगलांसाठी खूप खास असतो. या आठवड्यातला प्रत्येक दिवस हा एक खास दिवस म्हणून साजरा केला जातो. व्हॅलेंटाईन डे हा 14 फेब्रुवारी रोजी जगभरातील अनेक लोक साजरा करतात. इंग्रजी भाषिक देशांमध्ये, हा एक पारंपारिक दिवस आहे ज्या दिवशी प्रेम करणारे जोडपे व्हॅलेंटाईन कार्ड पाठवून आणि फुले देऊन एकमेकांवरील प्रेम व्यक्त करतात.
जगभरात 14 फेब्रुवारी हा दिवस प्रेमाचा दिवस मानला जातो. या दिवशी लोक त्यांचे प्रेम व्यक्त करण्यासाठी गुलाब, चॉकलेट आणि इतर भेटवस्तू देतात. तसेच या दिवशी आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी तरुण-तरुणी सोशल मीडियाद्वारे आपल्या जोडीदाराला खास शुभेच्छा पाठवतात. तुम्ही देखील तुमच्या जोडीदाराला व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी WhatsApp Status, Messages, Quotes पाठवून खास मराठमोळ्या शुभेच्छा देऊन तुमच्या मनातलं प्रेम व्यक्त करू शकता.
माझ्या चेह-यावरील हसू आहेस तू
माझ्या धडधडणा-या हृदयातील श्वास आहेस तू
माझ्या हसणा-या ओठांवरील सुंदरता आहेस तू
ज्यासाठी माझं हृदय व श्वास सुरू आहेत ती माझी सर्वस्व आहेस तू
हॅपी व्हॅलेंटाइन डे

मनाच्या तारा जुळून आलेल्या
सहवासाचा एक मधुर राग छेडलेला
संगतीत तुझ्या फुललेले जीवन
तुझ्या-माझ्या मैत्रीचा वेल गगनाशी भिडलेला
हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे

काळोखाच्या वाटेवर चालताना, हातामध्ये तुझाच हात…
धडपडत्या आयुष्याला सावरताना, आता फक्त तुझीच साथ..
हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे

तुझी माझी सोबत, सहवासाचं एक वचन आहे…
उमलत्या मैत्रीच्या कवितेचं,
मनातलं उत्स्फूर्त असं वाचन आहे
हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे

भाषा प्रेमाची मला कळते आहे
नकळतच मन माझे तुझ्याकडे वळते आहे
दूर असूनही मन मनाशी जुळते आहे
आठवणीतही सौख्य तुझ्या भेटीचे मज मिळते आहे
हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे

दरम्यान, 7 ते 14 फेब्रुवारी दरम्यान व्हॅलेंटाईन आठवडा साजरा केला जातो. या आठवड्यात रोझ डे, प्रपोज डे, चॉकलेट डे, टेडी डे, प्रॉमिस डे, हग डे, किस डे इत्यादी दिवस साजरे केले जातात. तसेच या आठवड्याचा शेवट व्हॅलेंटाईन डेने होतो. या दिवशी जोडपे आपले एकमेकांवरील प्रेम व्यक्त करतात.