
Dussehra 2023 Messages in Marathi: वाईटावर चांगल्याचा विजय हा दसरा किंवा विजयादशमी (Vijayadashmi 2023) हा सण म्हणून साजरा केला जातो. यंदा 24 ऑक्टोबरला दसरा सण साजरा होणार आहे. आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील दशमी तिथी 23 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5.44 वाजता सुरू होत असून दशमी तिथी 24 ऑक्टोबर रोजी दुपारी 3.14 वाजेपर्यंत राहील. उदय तिथीनुसार 24 ऑक्टोबरला दसरा साजरा होणार आहे. भगवान श्रीरामांनी या दिवशी रावणाचा वध केला होता. हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण मानला जातो.
विजयादशमीच्या दिवशी भगवान श्रीरामांनी रावणाचा वध करून दुष्टाईचा अंत केला होता. त्यामुळे दरवर्षी देशभरात रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जाते. दुसर्या मान्यतेनुसार, या दिवशी माता दुर्गेने 9 दिवसांच्या युद्धानंतर महिषासुराचा वध केला आणि अशा प्रकारे चांगुलपणाचा विजय झाला. दसऱ्यानिमित्त लोक एकमेकांना या मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा देतात. तुम्ही देखील दसऱ्या निमित्त Wishes, Greetings, Quotes, WhatsApp Status द्वारे आपल्या मित्र-परिवारास खास मराठमोळे संदेश पाठवू शकता. यासाठी तुम्ही खालील संदेश, ईमेज मोफत डाऊनलोड करू शकता.
लाखो किरणी उजळल्या दिशा,
घेऊनी नवी उमेद, नवी आशा,
होतील पूर्ण मनातील सर्व इच्छा
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

दुष्टांचा नाश, सर्वांचा विकास.
रावणाप्रमाणे प्रत्येक वाईट जळू दे,
आशा आणि विकासाची फुले फुलू दे.
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

देवी दुर्गा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो
आणि तुम्हाला चांगले आरोग्य, यश आणि आनंद देवो
दसऱ्याच्या मंगलमय शुभेच्छा!

वाईटावर चांगल्याची मात
महत्व या दिनाचे असे खास
जाळोनिया द्वेष- मत्सराची कात
मनोमनी वसवी प्रेमाची आस
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

झेंडूची तोरणं आज लावा दारी,
सुखाचे किरण येऊद्या घरी
पूर्ण होऊद्या तुमच्या सर्व इच्छा
दसऱ्याच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

विजयादशमीच्या दिवशी एशस्त्रांची पूजा करण्याचीही परंपरा आहे. याशिवाय विजयादशमीच्या दिवशी तुमच्या घरावर किंवा मंदिरात लाल ध्वज फडकावा. हा ध्वज विजयाचे प्रतीक आहे. यामुळे तुमचा विजय चिरकाल टिकेल. याशिवाय विजयादशमीचा दिवस कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी खूप शुभ मानला जातो.