Friendship Day 2023 Messages: फ्रेंडशिप डे निमित्त WhatsApp Status, Quotes, SMS, Wishes च्या माध्यमातून आपल्या जिवलग मित्र-मैत्रिणींना द्या खास शुभेच्छा!
Friendship Day 2023 Messages (PC - File Image)

Friendship Day 2023 Messages: आंतरराष्ट्रीय मैत्री दिन (, International Friendship Day) म्हणजेच फ्रेंडशिप डे (Friendship Day 2023) ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो. हा दिवस मित्रांना समर्पित आहे. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात कुटुंबानंतर अशी व्यक्ती नक्कीच असते जिच्याशी रक्ताचे नाते नसले तरी हृदयाचे नाते आयुष्यभर जोडलेले असते. मैत्रीचे हे नाते साजरे करण्यासाठी दरवर्षी ऑगस्टमध्ये आंतरराष्ट्रीय मैत्री दिन साजरा केला जातो. यंदा 6 ऑगस्ट रोजी मैत्री दिन साजरा करण्यात येणार आहे.

भारताव्यतिरिक्त बांगलादेश, मलेशिया, ऑस्ट्रेलियामध्येही या दिवशी फ्रेंडशिप डे साजरा केला जाणार आहे. मैत्री हे जगातील सर्वात मौल्यवान नाते आहे, म्हणूनच लोक हा दिवस मोठ्या थाटामाटात साजरा करतात. फ्रेंडशिप डे निमित्त WhatsApp Status, Quotes, SMS, Wishes च्या माध्यमातून तुम्ही आपल्या जिवलग मित्र-मैत्रिणींना सोशल मीडियाच्या माध्यमातून खास शुभेच्छा देऊ शकता.

रक्ताच्या नात्यात नसेल एवढी

मैत्रीच्या नात्यात ओढ असते,

कशी ही असली तरी

शेवटी मैत्री गोड असते.

!! मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

Friendship Day 2023 Messages (PC - File Image)

चांगल्या मैत्रीला,

वचन आणि अटींची गरज नसते.

फक्त दोन माणसं हवी असतात,

एक जो निभाऊ शकेल,

आणि दुसरा जो त्याला समजु शकेल.

हॅप्पी फ्रेंडशीप डे!

Friendship Day 2023 Messages (PC - File Image)

जेव्हा कुणी हात आणि साथ

दोन्ही सोडून देतं…

तेव्हा बोट पकडून रस्ता दाखवणारी

व्यक्ती म्हणजे मैत्री.

हॅप्पी फ्रेंडशीप डे!

Friendship Day 2023 Messages (PC - File Image)

तेज असावे सूर्यासारखे,

प्रखरता असावी चंद्रासारखी,

शीतलता असावी चांदण्यासारखी,

आणि मैत्री असावी तुझ्यासारखी.

हॅप्पी फ्रेंडशीप डे!

Friendship Day 2023 Messages (File Image)

खरच मैत्री असते

पिंपळाच्या पाना सारखी

त्यांची किती ही जाळी झाली तरी,

ती मनाच्या पुस्तकात

जपून ठेवावीशी वाटती.

!! मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

Friendship Day 2023 Messages (PC - File Image)

प्राप्त माहितीनुसार, 30 जुलै 1958 रोजी पॅराग्वेमध्ये आंतरराष्ट्रीय मैत्री दिन साजरा करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. 2011 मध्ये, संयुक्त राष्ट्रांनी 30 जुलै रोजी आंतरराष्ट्रीय मैत्री दिन साजरा करण्याची घोषणा केली, तथापि, अमेरिका, भारत, बांगलादेश यांसारखे अनेक देश ऑगस्टच्या पहिल्या रविवारी मैत्री दिन साजरा करतात.