Ganesh Visarjan Quotes In Marathi: अनंत चतुर्दशी (Anant Chaturdashi 2024) च्या दिवशी दहा दिवशीय गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यात येते. यंदा 17 सप्टेंबरला गणपती विसर्जन (Ganpati Visarjan 2024) करण्यात येणार आहे. या दिवशी गणेशभक्त आपल्या लाडक्या बाप्पाला जड अंतकरणाने निरोप देतात. तसेच पुढच्या वर्षी लवकर या, अशी साद घालतात. महाराष्ट्रात गणपती विसर्जन सोहळा नेत्रद्वीप असतो. मोठ-मोठी गणेश मंडळ या दिवशी गणरायाची मिरवणूक काढून त्यांना वाजत-गाजत निरोप देतात.
या दिवशी गणेशभक्त एकमेकांना अनंत चतुर्दशी तथा गणेश विसर्जनाच्या शुभेच्छा देतात. आम्ही तुमच्यासाठी अनंत चतुर्दशी स्लोगण, अनंत चतुर्दशी मराठी संदेश, अनंत चतुर्दशी संदेश, गणपती बाप्पा विसर्जन स्टेटस घेऊन आलो आहोत. तुम्ही सोशल मीडियाद्वारे हे शुभेच्छा संदेश शेअर करून या मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा आपल्या मित्र-परिवारास पाठवू शकता. (Anant Chaturdashi Images 2024: अनंत चतुर्दशीनिमित्त WhatsApp Stickers, GIF Greetings, Wallpapers च्या माध्यमातून पाठवा खास संदेश)
एक दोन तीन चार
गणपतीचा जयजयकार
पाच सहा सात आठ
गणपती बाप्पा आहे आपल्यासोबत
गणेश विसर्जनाच्या शुभेच्छा!
बाप्पा तुझा हात सदैव आमच्या माथी असू दे,
तुझी साथ जन्मोजन्म असू दे,
आनंद येऊ दे घरी,
प्रत्येक कामात मिळू दे ऐश्वर्य समृद्धी…
गणपती बाप्पा मोरया
अनंत चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा!
पुन्हा लागेल आस तुझ्या आगमनाची,
तुला पुन्हा डोळे भरून पाहण्याची,
कधी उजाडेल तो सोनेरी दिवस,
गणराया पुन्हा लागेल वेड तुझ्या आगमनाचे…
गणपती बाप्पा मोरया
अनंत चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा!
देव आला माझ्या घरी,
हौस भागवली दर्शनाची,
पुन्हा आला तो क्षण,
बाप्पा वेळ झाली तुझी परत तुझ्या घरी जाण्याची…
गणपती बाप्पा मोरया
अनंत चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा!
जाण्यास निघाला गणपती बाप्पा,
सारगतीरी जमला गोपाळांचा मेळा,
खिन्न मनाने सारे म्हणतील गणपती बाप्पा मोरया,
पुढच्या वर्षी लवकर या
अनंत चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा!
अनंत चतुर्दशी ही भगवान विष्णूला समर्पित आहे, ज्याची त्यांच्या अनंत रूपात पूजा केली जाते. या दिवशी, भक्त पवित्र धागे बांधतात आणि संरक्षण आणि समृद्धीसाठी प्रार्थना करतात. अनंत चतुर्दशी हा गणेश विसर्जनासाठी हा सर्वात शुभ दिवस मानला जातो. या दिवशी गणेशोत्सवाची सांगता होते.