World Consumer Day 2024 (PC - File Image)

World Consumer Day 2024: सध्याच्या युगात ग्राहकाने जागरूक राहणे अत्यंत गरजेचे आहे. भांडवलशाहीच्या या युगात ग्राहकाच्या दृष्टिकोनातून तुम्ही प्रत्येक आघाडीवर सावध राहिले पाहिजे. एक ग्राहक म्हणून, तुम्हाला अनेक अधिकार देण्यात आले आहेत, ज्याबद्दल तुम्ही जागरूक असणे आवश्यक आहे. तुम्हाला माहिती आहे का की जागतिक ग्राहक हक्क दिन (World Consumer Day 2024) दरवर्षी 15 मार्च रोजी साजरा केला जातो. या दिवशी ग्राहकांना जागरूक करण्याच्या उद्देशाने विविध उपक्रम राबवले जातात.

केवळ 15 मार्चलाच ग्राहक दिन का साजरा केला जातो या प्रश्नावर तुम्ही कधी विचार केला आहे का? जर नसेल तर आज आम्ही तुम्हाला याबद्दल सांगणार आहोत. याशिवाय 15 मार्च रोजी राष्ट्रीय ग्राहक दिन का साजरा केला जातो हे देखील जाणून घेऊयात. (वाचा -फसवणूक टाळण्यासाठी राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त ग्राहकांच्या 6 महत्वाच्या अधिकारांविषयी संपूर्ण माहिती)

जागतिक ग्राहक दिन साजरा करण्याची कल्पना सर्वप्रथम अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांनी दिली होती. 15 मार्च 1962 रोजी जॉन एफ केनेडी यांनी अधिकृतपणे यूएस काँग्रेसला संबोधित केले. या वेळी त्यांनी ग्राहकांशी निगडित हक्कांसंदर्भात आवाज उठवला. जॉन एफ केनेडी हे जगातील पहिले नेते होते ज्यांनी पहिल्यांदा ग्राहक हक्कांबद्दल चर्चा केली. (हेही वाचा - Consumer Court On Coaching Institutes: विद्यार्थ्यांनी शिक्षण मध्येच सोडल्यास कोचिंग इन्स्टीट्यूटनी शुल्क परत करावे- ग्राहक न्यायालय)

तथापी, 1983 मध्ये 15 मार्च रोजी प्रथमच ग्राहक दिन साजरा करण्यात आला. त्यानंतर दरवर्षी 15 मार्च रोजी जागतिक ग्राहक दिन साजरा केला जाऊ लागला. जागतिक ग्राहक दिन साजरा करण्याचा उद्देश ग्राहकांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणे हा आहे. आजच्या युगात काळाबाजार, साठेबाजी आणि बनावटगिरी वाढत आहे. अशा परिस्थितीत, लोकांना त्यांच्या ग्राहक हक्कांबद्दल माहिती असणे आवश्यक आहे.