Parsva Ekadashi 2024 Date: पंचांगानुसार, यावर्षी परिवर्तिनी एकादशी (Parivartini Ekadashi 2024) 14 सप्टेंबर 2024 रोजी साजरी केली जाणार आहे. परिवर्तिनी एकादशीलाचं पार्श्व एकादशी (Parsva Ekadashi 2024) असं म्हणतात. पार्श्व एकादशी हा हिंदूंसाठी महत्त्वाचा दिवस आहे. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या अकराव्या दिवशी ही एकादशी साजरी केली जाते. पार्श्व एकादशी शनिवारी, 14 सप्टेंबर रोजी साजरी केली जाईल. भगवान विष्णूला समर्पित हे व्रत आध्यात्मिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहे.
पार्श्व एकादशीला परिवर्तिनी, पद्म एकादशी असेही म्हणतात. या दिवशी भगवान विष्णूची पूजा करून व्रत केल्यास सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्ती मिळते आणि मोक्षप्राप्ती होते, अशी श्रद्धा आहे. चातुर्मासात भगवान विष्णू योग निद्रामध्ये राहतात. अशा स्थितीत या एकादशीला भगवान विष्णू बाजू बदलतात. या व्रताच्या पुण्यांमुळे साधकाच्या प्रत्येक मनोकामना पूर्ण होतात, असं मानलं जातं.
परिवर्तिनी एकादशी 2024 तारीख -
भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाची एकादशी तिथी सुरू 13 सप्टेंबर, शुक्रवार, रात्री 10:30 वाजता सुरू होते.
भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाची एकादशी तिथी समाप्ती 14 सप्टेंबर, शनिवार, रात्री 08:41 वाजता
उदय तिथीनुसार, शनिवार, 14 सप्टेंबर 2024 रोजी परिवर्तिनी एकादशी आहे.
पार्श्व एकादशीचे महत्त्व -
एकादशीच्या व्रताला हिंदू धर्मामध्ये अनन्य साधारण महत्त्व आहे. हा दिवस सर्वात शुभ दिवसांपैकी एक मानला जातो कारण तो भगवान विष्णूला समर्पित आहे. द्वादशी तिथीला एकादशी व्रताची समाप्ती होते. पारणाच्या वेळी लोकांना उपवास सोडावा लागतो, त्यामुळे सकाळी लवकर उठून पूजा करून श्री हरी विष्णूचा आशीर्वाद घ्यावा. हे व्रत केल्याने सुख, समृद्धी आणि सर्व सांसारिक इच्छा पूर्ण होतात.
परिवर्तिनी एकादशी पूजाविधी -
परिवर्तिनी एकादशीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर उठून सर्व कामांतून निवृत्त होऊन स्नान करावे. भगवान विष्णूची आराधना सुरू करा, सर्व प्रथम त्यांना जल अर्पण करा. भगवान विष्णूला पिवळे चंदन आणि अक्षत अर्पण करावे. भगवान विष्णूला फुले, हार, तुळशीची पाने इत्यादी अर्पण करा. यानंतर भगवान विष्णूला भोजन अर्पण करा. तुपाचा दिवा आणि उदबत्ती लावा आणि भगवान विष्णूच्या एकादशी व्रताचे पठण करा. पाठ केल्यानंतर, भगवान विष्णूच्या चालीसा मंत्राचा जप करा आणि योग्य प्रकारे आरती करा.