Vinayaka Chaturthi 2023: विनायक म्हणून ओळखल्या जाणार्या गणपतीला हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे. भगवान गणपतीची मनोभावे पूजा केल्याने अडथळे दूर होतात. त्यामुळे गणपतीला दु:खहर्ता असे ही म्हटले जाते. कोणतीही शुभ कार्य करण्यापूर्वी भगवंताची पूजा करणे शुभ मानले जाते. चतुर्थी तिथी हा गणपतीचा दिवस मानला जातो आणि म्हणून या दिवशी गणपतीची पूजा केली जाते. तथापि, प्रत्येक चंद्र महिन्यात दोन चतुर्थी तिथी असतात. अमावस्या नंतर येणारी पहिली चतुर्थी विनायक चतुर्थी आणि पौर्णिमेनंतर येणारी दुसरी संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाते.23 फेब्रुवारी 2023 रोजी विनायक चतुर्थी आहे. भक्त या दिवशी उपवास करतात आणि नंतर परमेश्वराची पूजा करतात.
जाणून घ्या, विनायक चतुर्थीची तारीख
द्रिक पंचांग नुसार, विनायक चतुर्थी तिथी 23 फेब्रुवारी रोजी पहाटे 03:24 वाजता सुरू होईल आणि 24 फेब्रुवारी रोजी दुपारी 01:33 वाजता समाप्त होईल. विनायक चतुर्थीचे व्रत गुरुवार, 24 फेब्रुवारी रोजी पाळले जाईल.
विनायक चतुर्थी 2023 पूजेचे शुभ मुहूर्त
विनायक चतुर्थीचा पूजेचा मुहूर्त 23 फेब्रुवारी रोजी सकाळी 11:26 वाजता सुरू होणार आहे आणि 23 फेब्रुवारी रोजी दुपारी 01:43 वाजतासंपणार आहे. विनायक चतुर्थीचा उपवास करणाऱ्या व्यक्तीने गणेशाची पूजा करावी.
विनायक चतुर्थी 2023 पूजा विधि
ज्या व्यक्तीला विनायक चतुर्थीचे व्रत करायचे असेल त्याने सकाळी लवकर उठून, म्हणजे ब्रह्म मुहूर्तामध्ये उठून स्नान करावे. त्यानंतर त्याने व्रत ठेवावे आणि नंतर श्रीगणेशाची पूजा करावी. पूजेच्या वेळी फुले, अगरबत्ती, मिठाई आणि नैवेद्य अर्पण करून आरती करून व्रत सोडावे.