Vinayak Chaturthi 2022 Messages: विनायक चतुर्थी निमित्त Messages, Images, Whatsapp Status द्वारे आपल्या मित्र-परिवारास द्या खास मराठी शुभेच्छा!
विनायक चतुर्थी शुभेच्छा (फोटो सौजन्य-फाइल इमेज)

Vinayak Chaturthi 2022 Messages: दर महिन्याला दोन्ही पक्षांची चतुर्थी गणेशाला समर्पित केली जाते. महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायक चतुर्थी असे म्हणतात. हिंदू धर्मात मांगलिक कार्य आणि कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणेशाच्या पूजेने केली जाते. कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी आणि शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणतात. गणेशजींना विघ्नहर्ता असेही म्हणतात.

यावेळी विनायक चतुर्थी 5 एप्रिल 2022 रोजी येत आहे. या दिवशी गणेशाचे भक्त उपास करतात. विनायक चतुर्थीला गणेशाची पूजा केल्याने ज्ञान आणि संपत्ती मिळते. विनायकी चतुर्थीच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठमोळी ग्रिटिंग्स, शुभेच्छापत्र, Messages, Wishes सोशल मीडीयात Facebook, Twitter, Instagram, WhatsApp Status द्वारा नक्की शेअर करा. यासाठी तुम्हाला खालील ईमेज नक्की उपयोगात येतील. या ईमेज तुम्ही डाऊनलोड करू शकता. (हेही वाचा - Vinayak Chaturthi 2022: यावेळी नवरात्रीच्या मध्यावर येत आहे 'विनायक चतुर्थी', जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजा विधी)

तव मातेचे आत्मरुप तू

ओंकाराचे पूर्ण रुप तू

कार्यारंभी तुझी अर्चना

विनायका स्वीकार वंदना

विनायक चतुर्थी निमित्त हार्दिक शुभेच्छा !

विनायक चतुर्थी शुभेच्छा (फोटो सौजन्य-फाइल इमेज)

|| वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ||

||निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा||

विनायक चतुर्थी निमित्त हार्दिक शुभेच्छा !

विनायक चतुर्थी शुभेच्छा (फोटो सौजन्य-फाइल इमेज)

गणपती तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण करोत..

तुम्हाला सुख समृद्धी, भरभराटी आणि उत्तम आरोग्य लाभो

हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना...

विनायक चतुर्थी निमित्त हार्दिक शुभेच्छा !

विनायक चतुर्थी शुभेच्छा (फोटो सौजन्य-फाइल इमेज)

तुझे नाम ओठी, तुझा ध्यास चित्ती

तुझ्या दर्शनाने मिळे आत्मशांती

विनायक चतुर्थी निमित्त तुम्हाला हार्दिक शुभेच्छा !

विनायक चतुर्थी शुभेच्छा (फोटो सौजन्य-फाइल इमेज)

चतुर्भुजी मंडित हो,

शोभती आयुथें करी

परशुकमलअंकुश हो,

मोदक पात्र भरी...

विनायक चतुर्थी निमित्त तुम्हाला हार्दिक शुभेच्छा !

विनायक चतुर्थी शुभेच्छा (फोटो सौजन्य-फाइल इमेज)

विनायक चतुर्थीच्या दिवशी सकाळी स्नान आटोपून गणेशासमोर उपवासाचे व्रत करावे. पूजेच्या वेळी पिवळे कपडे घालावेत. पूजेच्या वेळी गणेशजींना लाल सिंदूर म्हणजेचं गुलाल लावावा. यानंतर धूप, दिवा, अक्षता, नैवेद्य वगैरे अर्पण करावे. पूजेच्या वेळी गणेशजींना मोदक, लाडू आणि दूर्वा नक्की अर्पण करा.