महाराष्ट्रामध्ये 7 नोव्हेंबर हा दिवस विद्यार्थी दिवस (Vidayrthi Diwas) म्हणून साजरा केला जातो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांनी खडतर प्रवास पूर्ण करत आपलं शिक्षण पूर्ण केले. दलित समाजाला 'शिका संघटीत व्हा आणि संघर्ष करा' चा मूलमंत्र दिला. त्यांनी शिक्षणाचं महत्त्व अधोरेखित केलं. त्यांच्या सन्मानार्थ डॉ. आंबेडकरांनी शाळेत प्रवेश केलेल्या दिवसाला आता विद्यार्थी दिन म्हणून साजरे केले जाते. 7 नोव्हेंबर 1900 या दिवशी शालेय जीवनाला सुरूवात झाली. शिक्षणाप्रती आस्था असलेल्या या महामानवाला नमन करण्यासाठी साजर्या केल्या जाणार्या आजच्या विद्यार्थी दिवसाच्या शुभेच्छा तुम्ही तुमच्या मित्रमंडळी, नातेवाईकांसोबत शेअर करून या दिवसाचा आनंद द्विगुणित करू शकता. विद्यार्थी दिनाच्या शुभेच्छा WhatsApp Status, Facebook Messages, Wishes, Quotes, Greetings द्वारा शेअर करत या दिवसाचं सेलिब्रेशन करू शकता.
मानवाच्या उन्नतीचं एकमेव साधन म्हणजे शिक्षण आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शाळा प्रवेश दिनाचे स्मरण करत प्रत्येक विद्यार्थ्याने शिक्षणाकडे गांभीर्याने पाहण्यासाठी शासन 7 नोव्हेंबरला 'विद्यार्थी दिन' पाळतो.
विद्यार्थी दिनाच्या शुभेच्छा
वैश्विक स्तरावर डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन हा 15 ऑक्टोबरला साजरा केला जातो. पण महाराष्ट्रामध्ये महामानवाला आदरांजली अर्पण करत 7 नोव्हेंबरला विद्यार्थी दिन पाळला जातो. पत्रकार अरुण जावळे हे 2003 पासून शाळा प्रवेश दिनाचे आयोजन करत आलेले आहेत. अरुण जावळे यांनी या दिनाला 'विद्यार्थी दिवस' म्हणून घोषित करण्याची मागणी महाराष्ट्र शासनाकडे केली होती. त्यानंतर महाराष्ट्र शासनाने 2017 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ हा दिवस 'विद्यार्थी दिवस' घोषित केला.