Veer Savarkar Quotes | File Image

विनायक दामोदर सावरकर (Vinayak Damodar Savarkar) हे वीर सावरकर (Veer Savarkar) म्हणून देखील अनेकांना ओळखीचे आहेत. प्रखर हिंदू विचारवंत, स्वातंत्र्य सैनिक, वकिल, तत्त्वज्ञ विनायक दामोदर सावरकर(Vinayak Damodar Savarkar) हे स्वातंत्र्यसेनानी सोबतच लेखक, भाषाकारही  होते. मातृभूमीच्या प्रेमापोटी त्यांनी आपलं जीवन अर्पण केलं. ब्रिटिश सत्तेसमोर लाचारी न पत्करता त्यांनी कठोर काळ्या पाण्याची शिक्षा भोगली. आज 28 मे ही त्यांचा जन्मदिवस. यंदा भारतासह परदेशात स्वातंत्र्यसेनानी वीर सावरकर यांची 137 वी जयंती साजरी केली जात आहे. देशभक्त सावरकरांचं संपूर्ण आयुष्य तरूण पिढीसाठी प्रेरणास्थान आहे. त्यांच्या ज्वलंत आणि दुरगामी विचारांमधून त्याचा प्रत्यय येतो.  म्हणूनच आज त्यांच्या जयंती निमित्त पुढच्या पिढीसाठी आदर्श असणार्‍या  भारतमातेच्या सुपुत्रांंपैकी एक वीर सावरकर यांचे  विचार व्हॉट्सअ‍ॅप(WhatsApp), मेसेंजर (Messenger) , मेसेजेस, SMS यांच्यामाधून पुढच्या पिढीला नक्की पोहचवा. त्यासाठी यंदा लेटेस्टली टीमने बनवलेले हे Images तुम्ही नक्की डाऊनलोड करू शकता.

वीर सावरकर हे क्रांतिकारक, भाषाशुद्धी, लिपीशुद्धी चळवळीचे समर्थक देखील  होते. मराठी भाषेला त्यांनी अनेक शब्द दिले आहेत. दरम्यान विज्ञानाचा पुरस्कार करत त्यांनी जातीभेदालाही प्रखर विरोध केला होता. वीर सावरकर यांच्या पुण्यतिथी निमित्त जाणून घ्या त्यांच्या मृत्यूचे खरे कारण

वीर सावरकर यांचे प्रखर विचार  

Veer Savarkar Quotes | File Image

हे मातृभूमी,

तुजसाठी मरण ते जनन

तुजवीण जनन ते मरण

-वीर सावरकर

Veer Savarkar Quotes | File Image

अनेक फुले फूलती । फुलोनिया सुकोन जाती ।।

कोणी त्यांची महती गणती ठेविली असे ।।

मात्र अमर होय ती वंशलता । निर्वंश जिचा देशाकरिता ।।

-वीर सावरकर

Veer Savarkar Quotes | File Image

उदात्त ध्येयासाठी केलेलं कोणतेही बलिदान वाया जात नाही.

-वीर सावरकर

Veer Savarkar Quotes | File Image

ज्येष्ठांच्या अनुमतीसाठी अडुन बसायचे नसते

त्यांच्या आशीर्वादाची अपेक्षा बाळगायची असते.

-वीर सावरकर

Veer Savarkar Quotes | File Image

आपण एकटे असलो तरी हरकत नाही. आपल्यामागे  कुणी येवो ना येवो .

जे आपल्याला करावसं वाटत ते करण्यातच आपल्या जीवनाची सार्थकता आहे.

- वीर सावरकर

Veer Savarkar Jayanti Wishes: विनायक दामोदर सावरकर जयंती निमित्त Messages, HD Images, Wallpapers - Watch Video 

स्वातंत्र्यवीर सावरकर 83 वर्षांचे जीवन ते जगले. त्यांना  जीवनात  आता रस हा विचार आला तेव्हाच त्यांनी आत्मार्पण करण्याचे ठरवले. आजपर्यंत महापुरुषांनी आणि साधुसंतांनी जे केले त्याच मार्गाने जाण्याचा त्यांनी निर्धार केला.26 फेब्रुवारी 1966 दिवशी त्यांचे निधन झाले. सावरकरांना बहाल करण्यात आलेल्या वीर या पदवीबद्दल अजूनही समाजातील काही घटकांमध्ये वाद आहेत. मात्र आज त्यांच्या जयंतीनिमित्त सावरकरांना मानणार्‍या त्यांच्या चाहत्यांसाठी त्यांचे हे विचार खूप प्रेरणा देणारे आहे. त्यामुळे त्यांच्या स्मृतीला आमचे शतश नमन!