![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2022/06/Vat-Purnima-2022-HD-Images_1-380x214.jpg)
Vat Purnima 2022 HD Images: हिंदू दिनदर्शिकेनुसार अखंड सौभाग्य मिळविण्यासाठी वटपौर्णिमेचे व्रत दरवर्षी ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी पाळले जाते. या व्रताला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. यावर्षी 14 जून, मंगळवारी वटपौर्णिमेचा सण साजरा करण्यात येणार आहे. पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू आणि भगवान सूर्याची पूजा केली जाते. विवाहित महिला ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी पतीच्या दीर्घायुष्यासाठी वट पौर्णिमा व्रत करतात. या दिवशी वटवृक्ष आणि सावित्री-सत्यवान यांची पूजा करण्याचा नियम आहे. असे मानले जाते की, हे व्रत करणाऱ्या महिलांना व्रताच्या प्रभावामुळे त्यांच्या पतीचे दीर्घायुष्य आणि सुखी वैवाहिक जीवनाचे वरदान मिळते.
वट पौर्णिमेनिमित्त खास मराठमोळे Quotes, Messages, Wallpapers, Greetings शेअर करून सौभाग्याचा सण साजरा करा. वट पौर्णिमेनिमित्त खास शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही खालील ईमेज डाऊनलोड करू शकता. (हेही वाचा - Vat Purnima 2022 Messages: वट पौर्णिमेनिमित्त Wishes, Images, WhatsApp Status, Greeting द्वारे सुवासिनींना द्या खास मराठी शुभेच्छा!)
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2022/06/Vat-Purnima-2022-HD-Images_2.jpg)
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2022/06/Vat-Purnima-2022-HD-Images_1.jpg)
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2022/06/Vat-Purnima-2022-HD-Images_4.jpg)
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2022/06/Vat-Purnima-2022-HD-Images_3.jpg)
![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2022/06/Vat-Purnima-2022-HD-Images_4.jpg5_.jpg)
वट पौर्णिमेच्या दिवशी महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटवृक्षाची पूजा करतात. वटवृक्षात त्रिदेव म्हणजेच ब्रह्मा, विष्णू, महेश राहतात. त्याचबरोबर वटवृक्षाची पूजा केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते. त्यामुळे हिंदू धर्मात वटवृक्षाला खूप महत्त्व दिले जाते. उत्तर भारतात याला वट सावित्री व्रत आणि दक्षिण भारतात वट पौर्णिमा व्रत म्हणतात.