रांगोळी (Photo Credits : Instagram

Vat Purnima 2021 Rangoli Designs:  वट पौर्णिमेचे पर्व खासकरुन गुजरात, महाराष्ट्र, गोवासह दक्षिण भारतात साजरे केले जाते. तर 24 जून रोजी वट पौर्णिमा सर्व विवाहित महिलांकडून साजरी केली जाणार आहे. वट पौर्णिमेचे पर्व उत्तर भारतात जेष्ठ महिन्यातील अमावस्येला पार पाडले जाते. तर दक्षिण आणि पश्चिम भारतात पौर्णिमा साजरी केली जाते. यासाठी त्याला वट पौर्णिमा असे म्हटले जाते. या दिवशी विवाहित महिला आपल्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी व्रत ठेवतात. तसेच वट वृक्षाची सुद्धा महिलांकडून पूजा केली जाते.

संपूर्ण भारतामधील स्त्रिया वडाची पूजा करताना जन्मोजन्मी हाच पती मिळावा अशी प्रार्थना करते. या दिवशी वडाच्या झाडाला अनन्यसाधारण महत्व असून तो अनेक वर्ष आयुष्य असणारा एक भक्कम वृक्ष म्हणून ओखळला जातो. यमाकडून चातुर्याने पतीचे प्राण परत मिळवणार्‍या सावित्रीच्या पतिव्रत्याचे प्रतीक म्हणून हे व्रत केले जाते. त्याचसोबत वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनी स्त्रिया एकमेकांना वाण देतात. तर वट पौर्णिमेनिमित्त 'या' सोप्प्या, सुंदर रांगोळी काढून सजवा अंगण.(Vat Purnima 2021 Ukhane: वट पौर्णिमेच्या या खास उखाण्यांनी पूर्ण करा मैत्रिणी, घरातील वडिलधार्‍यांचा हट्ट)

तर वटवृक्ष हा शिवरुपी असून वटवृक्षाची पूजा करणे, म्हणजेच वडाच्या झाडाची पूजा करुन शिवरुपी पतीला मिळवणे असे मानले जाते. त्याचसोबत पतीचे आयुष्य वाढून त्याची आयुष्यातील प्रत्येक कर्माला साथ मिळावी यासाठी इश्वराची पूजा करणे असे मानले जाते.