महाराष्ट्रात सवाष्ण महिलांसाठी खास असलेला एक दिवस म्हणजे वट पौर्णिमा (Vat Purnima). हिंदू धर्मातील पौराणिक कथेनुसार, सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवण्यासाठी केलेल्या केलेले व्रत म्हणजे हे वट सावित्रीचं व्रत (Vat Savitri Vrat). दरवर्षी ज्येष्ठ पौर्णिमेला वट पौर्णिमा साजरी करताना महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करून उपवास करतात, वडाच्या झाडाची पूजा करतात. दरम्यान पूर्वीच्या काळी केवळ अशा सण समारंभातूनच महिला घराबाहेर पडून एकत्र जमत असल्याने या सणाच्या निमित्ताने त्या काही मजा मस्ती देखील करत असतं. मग यामध्ये नटण्या सजण्यापासून नव्या नवरीची थोडी मज्जा म्हणून तिला पतीचं नाव उखाण्यात घेण्याचा हमखास हट्ट केला जातो. मग यावर्षी तुम्ही देखील वट सावित्रीच्या पूजेसाठी घराबाहेर पडणार असाल तर काही उखाणे लक्षातठेवूनच घराबाहेर पडा म्हणजे घरातील ज्येष्ठांनी, मैत्रिणींनी आयत्यावेळी हट्ट केल्यास तुमची धांदल उडणार नाही. नक्की वाचा: Vat Purnima Special Ukhane: वडाच्या पूजेनंतर होणारा नाव घेण्याचा अट्टाहास पूर्ण करण्यसाठी सुवासिनींसाठी वटपौर्णिमा विशेष उखाणे
वटपौर्णिमा उखाणे
1. आयुष्यात सुख-दु:ख दोन्ही असावे
--- राव पती म्हणून सातही जन्म सोबत असावे
2. गुलाबापेक्षा नाजूक दिसते शेवंती
-- ला दीर्घायुष्य मिळो हीच ईश्वराला विनंती
3. भरजरी साडीला जरतारी खण
--- चं नाव घेते आज वटपौर्णिमेचा सण
4. कोल्हापूरच्या देवीचा सोन्याचा साज
--- चं नाव घेते वटपौर्णिमेचा सण आज
5. तीन वर्षांतून एकदा येतो अधिकमास
--- साठी आज केला वटपौर्णिमेचा उपवास
वटसावित्रीचं व्रत हे तीन दिवस केले जाते. त्रयोदशी पासून पौर्णिमेच्या रात्रीपर्यंत उपवास करण्याची प्रथा आहे. पण आजकाल केवळ वटपौर्णिमेच्या दिवशी महिला उपवास करतात. सकाळी वडाच्या झाडाची विधिवत पूजा करून त्याच्याभोवती 7 फेर्या मारून पुढील सातही जन्म हाच पती मिळू दे म्हणून प्रार्थना केली जाते.