माघ शुल्क पंचमीचा दिवस हा वसंत पंचमी (Vasant Panchami) म्हणून साजरा केला जातो. हिंदू पुराणकथांनुसार, आजच्या दिवशी ब्रम्हांच्या मुखातून माता सरस्वती प्रकट झाली होती. सरस्वती ही बुद्धी आणि ज्ञानाची देवता आहे. वसंत पंचमी च्या दिवशी ब्रम्हांडाला आवाज प्राप्त झाला असंही म्हटलं जातं. त्यामुळे या दिवसाचं विशेष महत्त्व आहे. दरम्यान निसर्गातही बदल होत असतात. वसंत ऋतूच्या आगमनाची चाहुल मिळते त्यामुळे नव्या ऋतूसह माता सरस्वतीचं स्मरण करत वसंत पंचमीच्या मराठमोळ्या शुभेच्छा तुमच्या नातेवाईकांना, प्रियजनांना देत हा दिवस अजून थोडा स्पेशल करा.
वसंत पंचमी दिवशी पिवळं वस्त्र परिधान करून सरस्वती मातेची पूजा आणि आराधना करणं शुभ असतं असं म्हटलं जातं. वसंत पंचमी ते माघ पौर्णिमा हा काळ वसंतोत्सव म्हणूनही साजरा केला जातो. या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन केले जाते.
वसंत पंचमीच्या शुभेच्छा
पौराणिक कथेनुसार, जेव्हा ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती पूर्ण केली तेव्हा त्यांना आढळले की विश्वात सर्व काही आहे, परंतु सर्व काही मूक, शांत आणि नीरस आहे. मग त्यांनी आपल्या कमंडलातून पाणी काढून शिंपडले, त्यामुळे माता सरस्वती तेथे प्रकट झाली. त्यांनी हातात वीणा, जपमाळ आणि पुस्तक घेतले होते. माता सरस्वतीने वीणासोबत वसंत राग वाजवला. त्याचाच परिणाम म्हणून सृष्टीला वाणी आणि संगीत लाभले. हा दिवस माघ शुक्ल पंचमीचा होता म्हणून दरवर्षी या तिथीला वसंत पंचमी साजरी केली जाते