Valentine’s Day 2019: ट्विटरवर रंगतय Valentine’s Day Challenge, जगभरात सिंगल मुलींना यंदा मिळतेय डेट!
Valentine's Day (Photo: Sandeep Mahankal/IANS)

Valentine’s Day 2019: रिलेशनशीप म्हटलं की नात्यात मुलानेच पुढाकार घ्यायला पाहिजे या हट्टापायी अनेकजणी त्याच्या प्रेमाची कबुली देत नाही. तुम्ही सुद्धा आज याच हट्टापायी किंवा प्रेमाची कबुली देता येऊ न शकल्याने सिंगल असाल तर ट्विटरवर सुरू असलेलं Valentine’s Day challenge घेऊन बघाच. लेखक, ब्लॉगर, सेक्स आणि रिलेशनशीप यावर समुपदेशन करणारी Oloni हीने जगातल्या सिंगल मुलींना (Single Girls) आज त्यांच्या 'क्रश' (Crush)ला डेटवर येण्यासाठी मेसेज करण्याचं चॅलेंज दिलं आहे. या चॅलेंजमध्ये ट्विटरवर ( Twitter  Challenge) जगभरातल्या मुली आपला रिप्लाय शेअर करत आहेत.  Happy Valentine’s Day शुभेच्छा देण्यासाठी खास Romantic Quotes, Greetings, GIF Images,WhatsApp Messages,SMS; प्रेमाचा दिवस आज नक्की खास बनवा!

काहींच्या हाती यंदा Valentine’s Day challenge मुळे रोमॅन्टिक डेट आली आहे तर काहींच्या पदरात निराशा आली आहे. पहा सोशल मीडियावर आज धूमाकुळ घालत असलेलं हे खास चॅलेंज

 

 

 

प्रेम केवळ मनात असून उपयोगाचं नाही ते योग्य वेळी आणि योग्य व्यक्तीसमोर व्यक्त करतादेखील यायला हवं. सिनेमामुळे असेल किंवा आपल्या समाज संस्कृतीमुळे नेहमीच मुलाने प्रपोझ करायला हवं असा हट्ट असतो. पण नात्यामध्ये मुलीदेखील पहिलं पाऊल उचलू शकतात. फार फार तर 'नकार' मिळेल पण प्रेम व्यक्तच केलं नाही किंवा विचारलचं नाही या गिल्टमध्ये राहण्यापेक्षा आज तुम्हांला संधी आहे. त्याला आज विचारून पहाच एकदा!