Tulsi Vivah Invitations | Photo credits: File Photo

Tulsi Vivah 2019 Invitation  Marathi Messages Format:  कार्तिकी म्हणणेच देव उठनी एकादशी (Dev Uthani Ekadashi)  पार पडल्यानंतर सार्‍यांनाच वेध लागतात ते म्हणजे तुळशीच्या लग्नाचे! यंदा तुळशीच्या विवाहाची (Tulsi Vivah) धामधूम 8 नोव्हेंपासून 12 नोव्हेंबरपर्यंत रंगणार आहे. मग तुमच्या घरी देखील तुळशीच्या लग्नाची धामधूम सुरू झाली असेल. या दिवशी लक्ष्मीच्या रूपातील 'तुळस' आणि विष्णूच्या रूपातील 'शाळीग्राम' याचा विवाह सोहळा संपन्न होतो. एका सामान्य लग्नसोहळ्याप्रमाणेच तुळशीचा विवाह पार पडतो. मग तुळशीच्या लग्नाचंदेखील आमंत्रण असतं. काही हटके अंदाजात तुमच्या घरातील तुलसीविवाह सोहळ्याचं आमंत्रण व्हॉट्सअ‍ॅप स्टेट्स, मेसेजेसच्या (WhatsApp Messages) माध्यमातून देऊन नातेवाईकांना, आप्टेष्टांना आमंत्रण देण्यासाठी या निमंत्रणपत्रिका नक्की शेअर करा आणि तुळशीच्या लग्नाच्या सोहळ्याचं सेलिब्रेशन दणक्यात करा. (हेही वाचा - Tulsi Vivah 2019: यंदा तुळशी विवाह 'कधी' आहे आणि 'का' साजरा करतात? जाणून घ्या काय आहे यामागची अख्यायिका)

तुलसी विवाह कार्तिक शुद्ध एकादशीपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत कधीही करू शकतात. त्यामुळे तुमच्या घरी देखील यंदा साजरा केल्या जाणार्‍या तुळशी विवाहाच्या सेलिब्रेशनचं आमंत्रण व्हॉट्सअ‍ॅप, फेसबूक स्टेट्स( Facebook Status), मेसेजेस द्वारा फॉरवर्ड करा. Tulsi Vivah 2019: 'या' पारंपारिक मंगलाष्टकांच्या जयघोषात लावा यंदा तुळशीची लग्नं!

नमुना 1:

सॉरी Friends,

I Am Very सॉरी..!!

लग्न इतक्या गडबडीत ठरलं,

आणि लग्नाची तारीख पण खुपच लवकर काढली..!!

त्यामुळे सगळं जमवायला वेळ ही खुप कमी मिळालाय,

ह्या लग्नाच्या धावपळीत तुमच्या पर्यंत

पत्रिका पोहचो न पोहचो तरी

हेच निमंत्रण समजुन तुम्ही या..

लग्नाची तारीख 9-11-2019 आहे, संध्याकाळीः 7.20 वा..

.

.

.

.

आमच्या तुळशीच्या लग्नाला यायचं हं!

नमुना 2:

आज आमच्या तुळशीच्या लग्नाला यायच हं...

वेळ - संध्याकाळी 7.30 वाजता

लग्न आमच्या दारात आणि जेवणाची सोय तुमच्या घरात केलेली आहे!

Tulsi Vivah | FIle Photo

नमुना 3:

॥ तुळशीविवाह ॥

चि. विष्णू आणि चि.सौ.का. तुळशी

यांचा विवाहसोहळा आमच्या घरी शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2019 दिवशी आयोजित केला आहे. सायंकाळी 7 वाजण्याच्या शुभमुहूर्तावर पार पडणार आहे.

विवाहस्थळ: तुळशी वृंदावन

आमच्या तुळशीच्या लग्नाला यायच हं!

तुळशीचं लग्न लावणार्‍या व्यक्तीला या व्रताच्या माध्यमातून कन्यादान केल्याचं पुण्य मिळतं. अशी धारणा आहे. तसेच काहींच्या धारणेनुसार तुळशी विवाहाच्या व्रतामुळे घरातील कन्येला कृष्णाप्रमाणे वर मिळण्यास मदत होते.