आढाष वारी निमित्त हजारोंच्या संख्येने वारकरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पंढरपूरात (Pandharpur) दाखल होतात. तर आज (7 जुलै) संत तुकाराम महाराज (Tukaram Maharaj) यांच्या पालखी सोहळ्याचे आगमन सोलापूर (Solapur) जिल्ह्यात झाले. त्याचसोबत सकाळी पालखीने प्रस्थान केल्यावर नीरा नदीत तुकाराम महाराजांच्या पादुकांना स्नान घालण्यात आले. परंतु यावर्षी नदीर नदी कोरडी पडल्याने चक्क टँकरने पाणी मागवले होते.
मात्र नीरा नदीतील पाणी टँकरमध्ये भरुन पादूकांना स्नान घालण्यात आले. आज सकाळी दहा वाजताच्या सुमारास पालखीने अकलुज शहरात प्रवेश केला. तर सदाशिव माने प्रांगणामध्ये तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम होता. त्यामुळे या ठिकाणी पालखी सोहळ्याचे आज तिसरे गोल रिंगण पार पडले आहे.
या गोल रिंगण सोहळ्यासाठी आणि पालखीचे दर्शन घेण्यासाठी वारकऱ्यांसह अनेक भाविकांनी येथे मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली होती. आढाष वारीच्या यात्रेसाठी सर्व वारकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. त्यामुळे विठुरायाची भेट पंढरपूरात कधी होत आहे याची आतुरता प्रत्येक वारकऱ्याला लागून राहिली आहे.