श्रीमंत दगडूशेठ हलावाई गणपतीच्या दर्शनाला थायलंडचे सैन्यदल प्रमुख
दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला थायलंडचे सैन्यदल प्रमुख (Photo Credit : twitter)

पुणे : महाराष्ट्रभर गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. घरागुती गणपतींसोबतच सार्वजनिक मंडळांमध्येही गणेश मूर्तींची स्थापना झाली आहे. अनेक गणेशभक्त तासनतास रांगेत उभे राहून गणपती बाप्पाचं दर्शन घेत आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरूवातच पुण्यात झाल्याने तेथे उत्साहात आणि पारंपारिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला जातो.

dagadusheth

वातावरणात चैतन्य निर्माण करणार्‍या सार्वजनिक गणेशोत्सवाची परदेशी नागरिकांना भूरळ पडली नाही तरच नवल. पुण्यात मानाच्या गणपतींसोबतच श्रीमंत दगडूशेठ गणपतीला भाविक खास गर्दी करतात. यंदा थायलंडच्या सैन्य दलाचे प्रमुख लेफन्टंट जनरल चुचरार्ट बुखाओ यांनीदेखील दगडूशेठचं दर्शन घेतलं. सोबतच त्यांना दगडूशेठची आरती करण्याचाही मान मिळाला आहे. सध्या ते पुण्यातच BIMSTEC च्या मिलिटरी एक्सरसाईजसाठी आहेत. नक्की वाचा : श्रीमंत दगडूशेठ गणपतीला १२६ किलोचा मोदक अर्पण

गणपती हा भारताप्रमाणेच थायलंडमध्येही पूजला जातो. थायलंडमध्ये विविध रूपात गणपती पहायला मिळतो. काही दिवसांपूर्वी मुंबईतील सर्वात श्रीमंत गणपती अशी ओळख असलेल्या जीएसबी सेवा मंडळ, किंग्ज सर्कलच्या गणपतीला ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ब्रेट लीनेही भेट दिली होती.  नक्की वाचा :  १२६ वर्षांपूर्वी असा सुरू झाला श्रीमंत दगडूशेठ सार्वजनिक गणेशोत्सव