
Teachers Day Wishesh In Marathi: दरवर्षी 5 सप्टेंबर रोजी, भारताचे दिवंगत माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन (Dr. Sarvapalli Radhakrishnan) यांचा जन्मदिवस शिक्षक दिनाच्या (Teachers Day) रूपात साजरा केला जातो. आईच्या पोटातुन बाहेर आलेले नवजात बाळ हे कसे वागायचे, कसे बोलायचे या साऱ्या पासून अजाण असते, या बाळाला शिकवण देत पुढे आणायचे काम वेगवेगळ्या टप्प्यावर विविध व्यक्तींकडून केले जाते. सुरुवातीला कुटुंबातील, पुढे शाळा - कॉलेज मधील अनेक शिक्षकरूपी मार्गदर्शक आपल्याला वाट दाखवत पुढे आणतात. या सर्व शिक्षकांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे शिक्षकदिन. वास्तविक विचारांना दिशा देणाऱ्या शिक्षकांना कितीही गिफ्ट्स दिले तरी पुरणार नाही. पण तुमचा एखादा भावनिक संदेश त्यांना खुश करेल हे मात्र निश्चित! शिक्षकदिनी व्हॉट्सअॅप मेसेज, स्टेट्स (WhatsApp Status), ग्रिटिंग्स (Greetings) यांच्या माध्यमातून तुमच्या शिक्षकांना मराठमोळ्या शुभेच्छा देण्यासाठी ही शुभेच्छापत्र नक्की खास ठरतील.
शि.. शीलवान
क्ष.. क्षमाशील
क.. कर्तव्यनिष्ठ
हे गुण विद्यार्थ्याला देऊ करणारा दुवा म्हणेज शिक्षक
अशा सर्वांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा

विद्येविना मती गेली.. मती विना नीती गेली
नीतिविना गती गेली .. गती विना वित्त गेले
वित्ताविना सारे खचले.. इतके अनर्थ एका अविद्यने केले
या अविद्येचा काळोख हटवून विद्यारूपी प्रकाश देणाऱ्या.. सर्व शिक्षकांना
शिक्षक दिनाच्या शुभेच्छा

काळ्या फळ्यावर पांढऱ्या खडूची अक्षरे उमटवत
हजारोंच्या आयुष्यात रंग भरणाऱ्या शिक्षकांना
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

संघर्षाकडून यशाकडे नेणाऱ्या ज्ञानाच्या प्रवासात,
मार्गदर्शक व सोबती म्ह्णून कष्ट घेणाऱ्या शिक्षकांना
शिक्षक दिनाच्या शुभेच्छा

जेव्हा देशात निस्वार्थी निरपेक्ष व सेवावृत्तीने कोणतेही कार्य होते
तेव्हा त्या देशातील शिक्षकच खरे सन्मानपात्र असतात.
- डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

शिक्षक हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अविभाज्य भाग आहे. वयाच्या, जागेच्या किंवा अन्य साऱ्या बंधनांच्या पलीकडे असे एक शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे नाते असते. यंदाच्या शिक्षक दिनी आपल्या आयुष्यतील शिकवण दात्या सर्व शिक्षकांप्रति कृतज्ञता व्यक्त करा आणि आगामी वर्षभरात अजून नव्या गोष्टी शिकण्यासाठी सज्ज व्हा.