
चैत्र शुक्ल नवमीच्या दिवशी भगवान स्वामीनारायण (Lord Shree Swaminarayan) यांचा जन्म झाला अशी धारणा असल्याने हा दिवस भगवान स्वामी नारायण जयंती (Swaminarayan Jayanti) म्हणून देखील साजरा केला जातो. यंदा हा दिवस 17 एप्रिल दिवशी आहे. त्यामुळे जगभरातील हिंदू धर्मीय स्वामी नारायण यांची जयंती देखील मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यासाठी सज्ज आहेत. तुम्हांला देखील तुमच्या नातेवाईकांना, आप्तेष्टांना, मित्रमंडळींना या दिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या असतील तर WhatsApp Status, Facebook Messages, Wishes, Greetings, Photos शेअर करून हा दिवस खास करू शकाल. त्यासाठी लेटेस्टली कडून तयार करण्यात खालील फोटोज डाऊनलोड करून तुम्ही शुभेच्छापत्र शेअर करू शकाल.
राम नवमी सोबतच हिंदू बांधव स्वामी नारायण यांच्या जयंतीचा दिवस देखील मोठ्या उत्साहात साजरी करतात. सत्कर्मांसाठी स्वामी नारायण यांचे अनुयायी या दिवशी प्रार्थना करतात. ते एका छताखाली 24 तास विश्रांती न घेता भक्तिगीते वाजवण्यासाठी एकत्र येतात. ते भगवान स्वामीनारायण यांच्या आध्यात्मिक शिकवणीचे स्मरण करतात आणि इतर भक्तांसमोर त्यांचे वाचन करतात. भगवान स्वामीनारायणाचे दैवी आशीर्वाद मिळावेत यासाठी भक्त पुजेचे आयोजन करतात. त्यानंतर आरती करून पूजेची सांगता केली जाते आणि प्रसाद वाटप केला जातो.
स्वामी नारायण यांच्या जयंतीच्या शुभेच्छा





सनातन धर्माचा संदेश देण्यासाठी स्वामीनारायण यांना जगभर ओळखले जाते.
स्वामीनारायणांनी आपल्या अनुयायांना दिशा देण्यासाठी आपल्या हयातीमध्ये 6 मंदिरे बांधली. आजही मंदिराच्या बांधकामाचा वारसा कायम आहे.