
Swami Samarth Prakat Din Images 2022: श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराजांचा अवतार हा श्री दत्त परंपरेत चौथा मानला जातो. दत्तसंप्रदायात ही परंपरा पुढीलप्रमाणे आहे. वेद आणि पुराणकाळात श्रीदत्त ही विभूती होऊन गेली. अत्रिऋषी आणि अनसूया यांचा पुत्र म्हणजे श्रीदत्तगुरू हे होत. ऐतिहासिक दृष्टीने पाहता दत्तपरंपरेतील पहिले सत्पुरुष म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ होत.
पूर्वेकडील प्रांतात पीठापूर येथे 14 व्या शतकात त्यांचा जन्म झाला. त्यांनी आपला अवतार संपविताना ‘पुन्हा-भेटेन’ असे अभिवचन भक्तांना दिले आणि त्याप्रमाणे तेच पुढे नृसिंहसरस्वती या नावाने कारंजानगर येथे (कारंजा-वऱ्हाड) जन्मास आले. त्यांच्या अवतारकार्याचा कालावधी इ.सन 1378 ते 1458 हा आहे. त्यांनी गाणगापूर येथे श्रीपाद श्रीवल्लभांच्या पादुकांची स्थापना केली. इ. सन 1457 च्या सुमारास ते श्रीशैल यात्रेच्यावेळी कर्दळीवनातून गुप्त झाले आणि त्यानंतर सुमारे 300 वर्षांनी कर्दळीवनातून ते पुन्हा प्रकट झाले. तेच स्वामी समर्थ अक्कलकोट महाराज होते.
स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त खास मराठी Greetings, Wishes, Messages, Whatsapp Status शेअर करून तुम्ही प्रकट दिन साजरा करू शकता. खालील ईमेज डाऊनलोड करून तुम्ही आपल्या मित्र-परिवारास श्री स्वामी समर्थ प्रकटदिनाच्या मराठमोळ्या शुभेच्छा देऊ शकता.
श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त
तुम्हाला व तुमच्या परिवारास खूप खूप शुभेच्छा!

श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा !

भिऊ नकोस मी तुझ्या पाठिशी आहे…
स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा !

श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन निमित्त हार्दिक शुभेच्छा!

ऐतिहासिकदृष्ट्या स्वामी समर्थ तिसरे सत्पुरुष असून दत्ताच्या विभूतिमत्वाचा ते ‘चौथा अवतार’ मानले जातात. श्री दत्तसंप्रदायात जनार्दन स्वामी, एकनाथ, दासोपंत, माणिकप्रभू, नारायण-महाराज जालवणकर, चिदंबर दीक्षित, वासुदेवानंद सरस्वती ऊर्फ टेंबे स्वामी असे अनेक थोर सत्पुरुष होऊन गेले. श्री स्वामी समर्थांनी स्वत:च ‘मूळ पुरुष वडाचे झाड, दत्तनगर हे वसतिस्थान आणि नाव ‘नृसिंहभान’ असे भक्तांना सांगितल्याने दत्तसंप्रदायात श्री स्वामी महाराजांचे स्वरूप हे श्रीदत्ताचे ‘चौथे अवतारित्व’ मानण्यात आले. त्यामुळे दत्तभक्त हे स्वामीभक्त झाले.