
Swami Dayanand Saraswati Jayanti 2022 Images: स्वामी दयानंद सरस्वती हे महान विचारवंत आणि आर्य समाजाचे संस्थापक, देशभक्त आणि समाजसुधारक होते. हिंदू दिनदर्शिकेनुसार स्त्रीशिक्षण, सती प्रथा, बालविवाह बंदी, विधवाविवाह यांसारख्या गंभीर प्रश्नांवर प्रखर विचार मांडणारे स्वामी दयानंद सरस्वती यांची जयंती दरवर्षी फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षाच्या दहाव्या दिवशी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. महर्षी स्वामी दयानंद सरस्वती यांच्या जयंतीनिमित्त तुम्ही त्यांचे विचार आणि शुभेच्छा आपल्या मित्र-परिवाराला सोशल मीडियाच्या माध्यमातून पाठवू शकता. खालील ईमेज डाऊनलोड करून तुम्ही स्वामी दयानंद सरस्वती यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन संदेश पाठवू शकता. (वाचा - Swami Dayanand Saraswati Jayanti 2022: स्वामी दयानंद सरस्वती जयंती 'कधी' आणि 'का' साजरा केली जाते? जाणून घ्या सविस्तर)
आर्य समाजाचे संस्थापक
स्वामी दयानंद सरस्वती
यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस
विनम्र अभिवादन!

धर्मसुधारक स्वामी दयानंद सरस्वती
यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा!

भारतीय समाजसुधारक आणि आर्य समाजाचे संस्थापक
स्वामी दयानंद सरस्वती
यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस
विनम्र अभिवादन!

स्वामी दयानंद सरस्वती
यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन!

महान समाजसुधारक
महर्षी स्वामी दयानंद सरस्वती
यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन!

स्वामी दयानंद यांनी भारतीयांना धार्मिक अंधश्रद्धेपासून मुक्त करण्यासाठी 'वेदांकडे परत चला' असा संदेश दिला. वेदांच्या आधारे, त्यांनी बहुदेववाद, मूर्तीपूजा आणि इतर अंधश्रद्धांवर टीका केली आणि वैदिक धर्माच्या निराकार देव-पूजेचे समर्थन केले. त्यांनी वेद हे अपौरुषेय असल्याचे सिद्ध केले.