
Subhash Chandra Bose Jayanti 2021 Images: भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक श्रेष्ठ क्रांतिकारक नेते आणि आझाद हिंद सेनेचे सरसेनापती नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती आज संपूर्ण देशभरात उत्सहात साजरी होत आहे. केंद्र सरकारने नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती ‘पराक्रम दिवस’ (Parakram Diwas) म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म 23 जानेवारी 1897 ला झाला होता. सुभाषबाबूंचे मुळ घराणे बंगालमधील माहिनगर होते. त्यांचे वडील जानकीनाथ वकिलीच्या व्यवसायानिमित्त ओरिसातील कटकला आले होते. तेथेचं नेताजींचा जन्म झाला. आज नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त सोशल मीडियाच्या माध्यमातून WhatsApp Messages, Wishes, Greetings शेअर करुन खास मराठी शुभेच्छा नक्की द्या. (वाचा - नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती निमित्त त्यांच्या आयुष्याविषयी ही रोचक सत्ये जाणून घ्या)






नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यावर स्वामी रामकृष्ण आणि विवेकानंद यांचा मोठा प्रभाव होता. त्यांनी विवेकानंद आणि स्वामी रामकृष्ण यांच्या अनेक ग्रंथांचे वाचन केले होते. त्यानंतर नेताजींमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना जागृत झाली. याशिवाय या ग्रंथांमुळे सुभाषचंद्र बोस यांची धार्मिक ओढ वाढली. वयाच्या पंधराव्या वर्षापासून कटक आणि कलकत्त्याला भेटणाऱ्या साधू, बैरागी, योगी इत्यादींना प्रश्न विचारून त्यांच्याकडून आपल्याला खरा मार्ग सापडेल का, याचा शोध घेऊ लागले. दरम्यान, 1921 ते 1941 दरम्यान नेताजी यांना तब्बल 11 वेळा इंग्रजांनी अटक केली होती. 1941 मध्ये त्यांना नजरबंदीत ठेवण्यात आलं होतं. सुभाषचंद्र बोस यांना नेताजी म्हणणारा हिटलर हा पहिला व्यक्ती होता.