भारतीय बालदिन 2019: Google ने Doodle बनवून आपल्या खास शैलीत दिल्या बालदिनाच्या शुभेच्छा
Google Doodle (Photo Credits: Google)

Children's Day India 2019: जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन गुगल ने आज (14 नोव्हेंबर) बालदिनानिमित्त आपल्या खास शैलीत Doodle च्या माध्यमातून सर्वांना बालदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. Google ने या रंगीत डूडलमध्ये लहान मुलांचे बूट, डोंगर, झाडे, पक्ष्यांसहित नदी दाखवली आहे. तसेच यात झाडांना लहान मुलांचे बूट घातले आहेत. 14 नोव्हेंबर संपुर्ण भारतात देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिवसादिनी बालदिन साजरा केला जातो. नेहरूंना लहान मुले खूप प्रिय होते. त्यामुळे त्यांचे आणि लहान मुलांचे नाते काही औरच होते. त्यामुळे लहान मुलेही त्यांना चाचा नेहरु या नावाने संबोधत असे.म्हणूनच हा दिवस लहान मुलांसाठी समर्पित केला आहे.

आज संपूर्ण देशभरात बालदिन साजरा केला जाईल. मग त्यात Google देखील कसे बरे मागे राहील. म्हणून गुगलने नेहमीप्रमाणे खास अंदाजात सर्वांना बालदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 2009 पासून गुगल पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जन्मदिनी म्हणजे बालदिना निमित्ताने विशेष स्पर्धेचे आयोजन करत आहेत. त्यामुळे गुगल डूडल ने यावर्षी स्पर्धेचा जो विषय आहे When I Grow तो मांडला आहे. Children's Day India 2019: गुरुग्राम येथील दिव्यांशी सिंघल हिने Google Competition जिंकत साकारले 'बालदिन गुगल डूडल'

बालदिना दिवशी सर्व शाळांमध्ये हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी लहान मुले रंगीबेरंगी कपडे घालीने शाळेत जातात. तेथे पंडित नेहरुंविषयी काही खास गोष्टींचे कथाकथन केले जाते. या दिवसाविषयी माहिती सांगितली जाते. तसेच शाळेतील मुलांसाठी खास पदार्थ बनवले जातात. लहान मुलांना आकर्षक भेटवस्तू देखील दिल्या जातात.

पहा मराठी कलाकारांचे लहान पणीचे फोटो   

खरे पाहता युनायटेजड नेशन मध्ये 20 नोव्हेंबर 1954 ला जागतिक बालदिन म्हणून घोषणा केली होती. त्यानंतर भारतात बालदिवस हा 20 नोव्हेंबरला साजरा केला जायचा. मात्र पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या निधनानंतर चाचा नेहरूंच्या जन्मदिनी म्हणजेच 14 नोव्हेंबरला बालदिन साजरा केला जाऊ लागला.