Sisters Day 2021 Marathi Wishes: केवळ बहिण न राहता आई, मैत्रिण अशा विविध भूमिका अगदी सहज पार पाडणारी अशी बहिण असते. सुखाची सोबती आणि दु:खात साथ देणारं असं बहिणीचं नातं आहे. आपल्या मनातील सर्व गोष्टी आपण तिच्याजवळ शेअर करु शकतो. मनमोकळेपणाने बोलू शकतो. हक्काने भांडू शकतो. अशा सुंदर, सुरेख आणि हळव्या नात्याचा आजचा दिवस आहे. ऑगस्ट महिन्यातील पहिल्या रविवारी सिस्टर्स डे साजरा केला जातो. अमेरिका आणि भारत या देशांमध्ये उद्या, 1 ऑगस्ट रोजी सिस्टर्स डे साजरा होणार आहे. सिस्टर्स डे निमित्त आपल्या बहिणीला शुभेच्छा देण्यासाठी तुमच्यासाठी खास मराठी शुभेच्छा संदेश, Wishes, Messages, Greetings घेऊन आलो आहोत. व्हॉट्सअॅप स्टेटस (WhatsApp Status), फेसबुक मेसेंजर (Facebook Messenger), इंस्टाग्राम (Instagram), ट्विटर (Twitter) द्वारे है शुभेच्छा संदेश शेअर करुन तुम्ही बहिणीप्रती प्रेम व्यक्त करु शकता.
तुमची बहिण कशी आहे, यातील कोणता मेसेज तिला चपलखपणे बसतो, तुमच्या भावना कोणत्या मेसेजमधून स्पष्टपणे व्यक्त केल्या जात आहेत, त्यानुसार तुम्ही शुभेच्छा संदेश बहिणीला पाठवू शकता. तुमचा एक मेसेज बहिणीच्या चेहऱ्यावर हास खुलवेल, यात शंका नाही. (Happy Sisters' Day 2021: सिस्टर्स डे निमित्त आपल्या बहिणीवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी Messages, Greetings, Photos, Wallpapers, Wishes पाठवून द्या सरप्राइज)
सिस्टर्स डे शुभेच्छा संदेश:
आई नंतरची जागा घेणारी, भावंडांचा सांभाळ करणारी
लाडाची लेक म्हणून ओळखली जाणारी
बहिण माझी माझ्यावर जीव ओवाळणारी
Happy Sisters Day!
कधी भांडते तर कधी रुसते
तरीही न सांगता प्रत्येक गोष्ट समजते
Happy Sisters Day!
बहीणीचं नातं
नेहमीच घट्ट असतं
आयुष्य संपलं तरी
ते कधीच तुटत नसतं
Happy Sisters Day!
पवित्र नाते हे बहीण भावाचे
लखलखत राहू दे बंध जिव्हाळ्याचे
हॅप्पी सिस्टर्स डे!
आईनंतर शेवटच्या श्वासापर्यंत
निस्वार्थ प्रेम करणारी कुणी असेल
तर ती म्हणजे बहीण
Happy Sisters Day!
खरंतर सिस्टर्स डे साजरा करण्यामागील ठोस कारण अद्याप कोणी सांगू शकलेलं नाही. परंतु, सोशल मीडियावर लोकांचा यातील वाढता रस पाहता सिस्टर्स डे जोरदार साजरा केला जातो. यानिमित्ताने बहिणीबद्दलच्या भावना व्यक्त करण्याची ही एक संधीही मिळते. तुम्हा सर्वांना लेटेस्टली मराठीकडून हॅप्पी सिस्टर्स डे!