Lord Ram | File Photo

आज 5 दशकांनंतर अयोद्धेमध्ये श्रीराम जन्मभूमीवर भगवान श्रीरामाचे भव्य मंदिर (Ayodhya Ram Mandir) उभं राहत आहे. त्यामध्ये रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. हिंदूंसाठी आणि जगभरातील रामभक्तांसाठी आजचा हा दिवस दिवाळीपेक्षा कमी नाही. अनेकांनी अयोद्धेमध्ये रामाच्या आगमनाचा सोहळा आपल्या घरातही साजरा करण्यासाठी तयारी केली आहे. मोठ्या प्रमाणात रोषणाई केली आहे. मग असा हा मंगलमय दिवस तुमच्या रामभक्तमित्रमंडळींसोबत, आप्तेष्टांसोबत तसेच प्रियजनांसोबत साजरा करण्यासाठी भगवान श्रीरामांंचे हे काही खास फोटोज नक्कीच शेअर करू शकता.

आज दुपारी 12.30 च्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी मंदिरामध्ये गर्भगृहामध्ये भगावन श्रीरामांची मूर्ती स्थापन करणार आहेत. ही बाल श्रीरामाची मूर्ती आहे. अवघ्या 5  वर्षाचे श्रीराम आहेत. मंदिराच्या पहिल्या मजल्यावर श्रीरामांचा दरबार दाखवण्यात आला आहे. Jai Shree Ram Easy Rangoli Design: श्री रामाच्या स्वागतासाठी दारा समोर काढा सुंदर आणि सोप्या रांगोळी, पहा व्हिडिओ .

भगवान श्रीरामाचे फोटोज  

Lord Ram | File Photo
Lord Ram | File Photo
Lord Ram | File Photo
Lord Ram | File Photo
Lord Ram | File Photo
Ram | Twitter

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार, श्रीराम जन्मभूमीवर मंदिर उभारण्यात आलं आहे. राजस्थान मधील गुलाबी रंगाच्या दगडामध्ये रेखीव कोरीव काम करून हे मंदिर उभारण्यात आले आहे. आज प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर 23 जानेवारीपासून भाविकांना रामलल्लांचं मंदिर खुलं होणार आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संध्याकाळी भगवान श्रीरामांच्या स्वागतासाठी रामज्योति लावण्याचं आवाहन केले आहे.