Dagdusheth Ganpati (Photo Credits: Facebook)

गणेशोत्सव 2020 ला आजपासून प्रारंभ होईल. भाद्रपद महिन्यातील शुक्ल चतुर्थीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. हा दिवस प्रत्येक गणेशभक्तासाठी अत्यंत खास असतो. गणेश चतुर्थी निमित्त देशभरातील गणेश मंदिरांमध्ये आज बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होते. मात्र यंदा कोविड-19 च्या पार्श्वभू्मीवर राज्यातील मंदिरं बंद आहेत. त्यामुळे ऑनलाईन माध्यमातून गणपती बाप्पाचं दर्शन घेण्याची सोय मंदिरांमध्ये उपलब्ध करुन देण्यात आली आहे. पुणे शहरातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्येही (Dagdusheth Halwai Ganpati Temple) आज गणेश चतुर्थी निमित्त पार पडणारी पूजा लाईव्हच्या माध्यमातून पाहता येणार आहे. दगडूशेठ गणपतीच्या अधिकृत संकेतस्थळावर तसेच युट्युब चॅनेलवर लाईव्ह दर्शनाची सोय करण्यात आली आहे. येथे घ्या, गणेश चतुर्थी निमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन!

कोविड-19 संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव अगदी साधेपणाने आणि मंदिरातच साजरा करण्याचा निर्णय श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाने घेतला आहे. त्यामुळे दरवर्षी प्रमाणे गणेशोत्सवात साजरे होणारे कार्यक्रमही यंदा रद्द करण्यात आले आहे. दरम्यान, मंदिराकडून ऑनलाईन अभिषेकाची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यासाठी तुम्हाला केवळ गोत्र आणि नाव याची ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे. (Ganesh Chaturthi 2020 Messages: गणेश चतुर्थीच्या मराठी शुभेच्छा संदेश, Wishes, Images च्या माध्यमातून शेअर करुन साजरा करा यंदाचा गणेशोत्सव!)

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती हा राज्यातील मानाच्या गणपतींपैकी एक आहे. त्यामुळे गणेशोत्सवानिमित्त येथे मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. परंतु, यंदा भाविकांना मंदिराबाहेरुनच दर्शन घ्यावे लागणार आहे. तसंच यंदा हार, फुले, नारळ आणि पेढे स्वीकारले जाणार नाहीत. दरम्यान यंदा अनेक गणेशोत्सव मंडळांनी सोहळे रद्द केले आहेत.